मुक्तपीठ टीम
पाईप गॅसच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेड एमजीएसने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तसेच योग्य माहिती देण्यासाठी एमजीएलने ग्राहकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
“ग्राहक साहाय्य कर्मचाऱ्याला तुमच्या घरी प्रवेश देण्यापूर्वी”
- ओळखपत्रावर होलोग्राम स्टिकर व छायाचित्राखाली बारकोड असल्याची तपासणी करा.
- ओळखपत्राच्या वैधतेसाठी मुदतसमाप्ती तारखेची तपासणी करा.
मीटर वाचकाच्या तपशीलासाठी
- मीटर वाचकाविषयीचा एसएमएस अलर्ट तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर आगाऊ कळविण्यात येईल.
एमजीएल लोगो आणि मीटर वाचन एजन्सीचे नाव असणारा आकाशी रंगाचे शर्ट हा गणवेश असेल. - अॅन्ड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्सवर उपलब्ध असणाऱ्या एमजीएल कनेक्ट मोबाइल अॅपवर पाहणी करा.
- केवळ मीटर वाचनासाठीच.
सावधगिरी
- एमजीएल हे कोणत्याही अॅक्सेसरीजची विक्री करत नाहीत तसेच गॅस स्टोव्हच्या देखभालीसाठी त्यांच्या कोणत्याही सबसिडियरीज किंवा सिस्टर कन्सर्न्स नाहीत.
- विक्रीपश्चात सेवेसाठी, एमजीएलच्या वेबसाइटवर अधिकृत व्हेन्डर्सची यादी उपलब्ध आहे/कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधा.
- स्टोव्ह / बर्नर सर्व्हिससाठी, एमजीएल सेवा प्रदात्याचे किंवा बीपीसीएल अधिकृत एजन्सीचे ओळखपत्र तपासा.
- कोणतेही लबाडीचे कृत्य आढळून आल्यास, लगेचच स्थानिक पोलीस स्थानकाला कळवा.
पेमेन्ट
- पोस्टाच्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर कोठेही रोख पैसे भरू नयेत.
- धनादेश ‘ महानगर गॅस लिमिटेड सीए क्रमांक……. ह्या नावाने काढावा.
- क्रेडिट / डेबिट कार्ड, क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याच्या तुलनेत एमजीएल वेबसाईटद्वारे / बिल द्वारे नेट बँकिंग, यूपीआयचे शुल्क नाही. (अटी व शर्ती पहा)
- नैसर्गिक वायूच्या विक्रीवर व्हॅट लागू / किमान शुल्क आणि कॉपरच्या अधिक वापरलेल्या पाईपसाठी जीएसटी लागू
गैस गीजर्सच्या अधिकृत व सुरक्षित इन्स्टॉलेशनसाठी आमचे कस्टमर हेल्पलाइन क्रमांक ६८६७४५०० किंवा ६१५६४५००. ह्यांवर संपर्क साधा. ग्राहक साहाय्य कर्मचारी, मीटर वाचक, विक्रीपश्चात सेवेसाठीची एजन्सी ह्यांच्या पडताळणीसाठी कृपया ०२२२४०५७८४ वर संपर्क साधा.
महानगर गॅस लिमिटेड
- नोंदणीकृत कार्यालय: एमजीएल हाउस, ब्लॉक जी-३३, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०००५१ वेबसाइट: www.mahangargas.com
- सीआयएन: एल ४०२०० एमएच १९९५ पीएलसी ०८८१३३