मुक्तपीठ टीम
आपण सध्या डिजिटल युगात वावरत आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आपण डिजिटल पेमेंट करू शकतो. गुगल, पेटीएम आणि फोन पे हे डिजिटल पेमेंट साठी वापरले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय ॲप्स आहेत. या ॲप्सद्वारे डिजिटल व्यवहार करताना इंटरनेटची आवश्यकता भासते. इंटरनेट शिवाय पेमेंट करणे अशक्य असते. कधीकधी इंटरनेट च्या अभावामुळे पेमेंट करता येत नाही. आता यासाठी देखील एक पर्याय आता उपलब्ध आहे. ज्याद्वारे इंटरनेटशिवाय व्यवहार करणे शक्य होईल.
सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना *99# सेवा देतात. याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करू शकता. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ही एक आपत्कालीन सुविधा आहे, जी इंटरनेट नसताना वापरली जाऊ शकते. त्याच वेळी, फीचर फोनचे वापरकर्ते या सुविधेद्वारे UPI पेमेंट देखील करू शकतात.
इंटरनेटशिवाय पेमेंट शक्य
- UPI चा वापर करून इंटरनेट शिवाय व्यवहार करणे शक्य आहे.
- प्रथम *99# हा कोड मोबाईलचा डायलरवर वापरा.
- ही सेवा भारतात स्मार्टफोन नसलेल्या वापरकर्त्यांसह सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- जोपर्यंत एखादी व्यक्ती UPI इकोसिस्टमचा भाग आहे आणि यासाठी जो फोन वापरात आहे, तो नोंदणीकृत फोन नंबर व्यक्तीच्या UPI खात्याशी जोडलेला असेल.
- *99# सेवा वापरून सर्व UPI सुविधा मिळवणे शक्य आहे.
- आणीबाणीच्या वेळेस म्हणजेच जेव्हा अत्यंत गरज असताना इंटरनेट सेवा उपलब्ध नसेल तेव्हा स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी *99# ही ट्रिक अत्यंत उपयोगी आहे.
- इंटरनेट सुविधा उपलब्ध नसताना हा एकमेव मार्ग आहे.
इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याच्या पायऱ्या :
- युपीआय मध्ये नोंदणीकृत केलेला फोन नंबर व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
- फोन मधील डायलरवर *99# डायल करा.
- कॉल बटनावर क्लिक करा.
- यानंतर खुप पर्याय उपलब्ध होतील.
- पर्याय १ वर आणि त्यानंतर सेंड वर क्लिक करा.
- सेंड मनी पर्याय निवडा.
- ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्यांचा नंबर डायल करा.
- पेमेंट करणाऱ्या व्यक्ती चा नंबर UPI बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
- योग्य नंबर निवडा.
- किती रक्कम पाठवायचे आहे टाईप करा.
- सेंड वर क्लिक करा.
अशाप्रकारे इंटरनेट शिवाय देखील यूटीआयचा वापर करून डिजिटल पेमेंट करता येणे शक्य आहे.
*99# सेवा कशी बंद करावी
जर तुम्हाला ही सेवा नको असेल तर तुम्ही ती बंद देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या डायलरमध्ये *99# टाइप करून कॉल करावा लागेल आणि मेनूमधील चौथा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर ७ क्रमांक टाईप करा आणि पाठवा डीरेजिस्टर चा पर्याय निवडा. आपल्या निवडीची पुष्टी करण्यासाठी १ दाबा. आता तुमच्या UPI खात्यात ही सुविधा बंद केली जाईल.