मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनाच्या वेळी पंतप्रधानांसोबत असलेल्या खास पाहुण्यांबद्दल. पंतप्रधानांसाठी असलेल्या खास आसन व्यवस्थेच्या बॉक्समध्ये प्रजासत्ताक दिनी खास पाहुणे आहेत. हे खास पाहुणे देशातील १०० गुणवंत विद्यार्थी आहेत . त्यांना त्या खास जागेतून प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी मिळाली.
देशभरातील शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधान बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधान बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी मिळाली. तसेच या विद्यार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनाही भेटण्याची संधी दिली जाईल.
२०२० च्या बोर्डाच्या दहावी आणि १२ वीच्या परीक्षेतील प्रथम तसेच विविध विद्यापीठे आणि यूजी व पीजी अभ्यासक्रमांच्या टॉपर्सना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे..
प्रजासत्ताक दिनी संचलन पाहण्यासाठी शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमधील एकूण १०० विद्यार्थ्यांची यादी केली गेली होती. यापैकी ५० विद्यार्थ्यांची देशभरातील शाळांमधून आणि उर्वरित ५० विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण संस्थांमधून निवड करण्यात आली .
गेल्या वर्षीही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात १०५ सीबीएसई बोर्डाच्या टॉपर्स आणि युनिव्हर्सिटीच्या टॉपर्सना पंतप्रधान बॉक्समधून परेड पाहण्याची संधी देण्यात आली होती.
यावेळी कोरोना साथीमुळे आवश्यक असणारी दक्षता घेतली जात आहे. त्यामुळेच यावेळेस प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान मोटारसायकल स्टंट इत्यादी मुख्य आकर्षणांचा समावेश करण्यात आलेला नाही.
यावर्षी दर्शकांची संख्या २५,००० करण्यात आली आहे. ज्या मुलांना शौर्य पुरस्कार किंवा इतर पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यांना या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन समारंभात सहभागी करण्यात आलेले नाही.
पाहा व्हिडीओ :