मुक्तपीठ टीम
सोनी कंपनीने भारतात आपला सर्वात महाग टीव्ही लाँच केला आहे. ज्याची किंमत १२ लाख ९९ हजार ९९० रुपये आहे. या महागड्या टीव्हीला ब्राव्हिया एक्सआर मास्टर सीरीज 85Z9J 8K असे नाव देण्यात आले आहे. मोठी स्क्रीन असलेल्या या एलईडीचे रिझोल्यूशन 7,680 X 4,320 पिक्सेल आहे. हा टीव्ही अँड्रॉइड सॉफ्टवेअर आणि सोनी एक्सआर कॉग्निटिव्ह प्रोसेसरवर चालतो. सोनी रिटेल स्टोअर्स, ऑनलाइन स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे हा टीव्ही विकला जाईल.
दिमाखदार टीव्हीचे भन्नाट फिचर्स
- एक्सआर कॉग्निटिव्ह प्रोसेसरचा टीव्हीला मिळणार सपोर्ट.
- सोनीचा नवीन महागडा टीव्ही 8K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.
- 8K रिझोल्यूशन वापरकर्त्यांचा व्ह्यूइंग एक्सपीरियन्स वाढवेल.
- डॉल्बी व्हिजन फॉरमॅट आणि एचडीआर सपोर्ट एलईडीमध्ये देण्यात आला आहे.
- त्याच वेळी, टीव्ही गुगल इंटरफेससह स्मार्ट कनेक्टिव्हिटीवर चालतो.
- हे क्रोमकास्ट आणि अॅप्पल एअरप्लेला देखील सपोर्ट करते.
- ब्राव्हियामध्ये एक्सआर कॉग्निटिव्ह प्रोसेसर देण्यात आला आहे.
टीव्हीमध्ये असणार १० स्पीकर्स
- ब्राव्हिया एक्सआर मास्टर सीरीज 85Z9J टीव्हीमध्ये १० स्पीकर्स आहेत. ज्याला ८५ वॅटचे आउटपुट मिळेल.
- या स्पीकरमध्ये दोन मिड-रेंज ड्रायव्हर्स, चार ट्विटर आणि सबवूफर आहेत.
- हे डॉल्बी एटमॉस ऑडिओसह येते. एलईडीमध्ये १६जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आहे.
- त्याच वेळी, टीव्ही लोकल डिमिंग आणि अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनवर १२०एचझेड रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
हा टीव्ही भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा टीव्ही आहे. सोनी 8K पर्यायामध्ये सॅमसंग, एलजी आणि हायसेन्सशी स्पर्धा करते.