मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे हादरलेल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता पर्यटनाच्या माध्यमातून सुधारण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कोकणातील पावसाळी निसर्ग सौंदर्याचे आकर्षण दाखवत जगभरातील पर्यटकांना कोकणाच्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. तर जगातील इतर ग्लोबल महानगरांप्रमाणे मुंबईतील नाइट लाइफच्या बळावर पर्यटकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न असेल.
मिशन कोकण पर्यटन
- कोकणात पावसाळी पर्यटन सुरू करण्याची योजना आहे.
- कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांचे सौंदर्य पावसाळ्यात मनमोहक असते.
- चिपी विमानतळ आता तेथे सुरू होत असल्याने पीपीपी मॉडेलवर सात तारांकित हॉटेल उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- त्यामुळे कोकणातही ग्लोबल पर्यटकांना साजेशी लोकल सुविधा उपलब्ध होईल.
मुंबईत नाइट लाइफचं आकर्षण
- कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर मुंबईत रात्रीचे पर्यटन पुन्हा सुरू होईल. जर लंडनचे उदाहरण घेतले तर तेथे रात्रीच्या पर्यटनामुळे त्यांची कमाई कित्येक अब्ज पौंडांनी वाढली आहे.
- मुंबईत हे सुरू केल्याने रोजगार ३ पटीने वाढेल.
- मुंबईत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने किमान पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात घालवावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था सुधारणार
- ९ ऑक्टोबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, जे कोकणाला पर्यटनाचं ग्लोबल डेस्टिनेशन बनवेल.
- राज्यात अध्यात्म, नैसर्गिक वारसा, वन्यजीव आणि समुद्रकिनारा पर्यटनाला अधिक प्रोत्साहन दिले जाईल.
- ज्यामुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय पर्यटन वाढेल. महसूलही निर्माण होईल.
- अर्थव्यवस्था पुन्हा सुरळित करण्याची क्षमता पर्यटनामध्ये असल्याने, परदेशी पर्यटकांसाठी जागतिक धोरण बनवण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
पाहा व्हिडीओ:
https://youtu.be/6eV6QmZ8HNE