मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळ्याप्रकरणी आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. रवी राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
- आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
- अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते.
- त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली.
- घसरणीमुळे बँक गेल्या २ वर्षांपासून बँक बुडीत आहे.
- खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.
रवी राणांचे अडसूळांवर हे आरोप
- आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता.
- आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते.
- “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये १३-१४ शाखा आहेत.
- या बँकेत ९०० खातेदार आहेत.
- ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे.
- आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली.
- आता खातेदारांना केवळ १ हजार एवढी रक्कम मिळत आहे.
आनंद अडसूळ यांना चौकशी दरम्यान छातीत दुखायला लागल्यामुळे त्यांना गोरेगावच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ याची चोकशी सुरु आहे.
शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश
- आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार
- १९९६ पासून पाच वेळा खासदारकी
- गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभव झाला.