मुक्तपीठ टीम
नक्षलवादी भागात विकासासाठी आणि नक्षलवाद्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला १२०० कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी नक्षलवाद रोखण्यासाठी १० नक्षलवादी राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनिमित्त सहभोजनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत एकाच राऊंड टेबलवर उद्धव ठाकरे, नितिश कुमार आणि शिवराज चौहाण हे तीन मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी चांगल्याच गप्पा रंगल्याचे दिसत असल्याने ठाकरेंच्या आजी-माजी-भावी वक्तव्याचा दाखला देत चांगलीच खमंग चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांचं शहांना सादरीकरण
- केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली होती.
- या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण केलं.
- नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी १२०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
- दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणे, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणे, नवीन शाळा बांधण्यावर भर देणे आदींसाठी हा निधी लागणार आहे.
CM.@OfficeofUT had a lunch with union home minister.@AmitShah Madhya Pradesh CM.@ChouhanShivraj Bihar CM.@NitishKumar after meeting convened by the union home ministry of #naxal affected states
.@fpjindia pic.twitter.com/BfHFVWc6g5— Sanjay Jog (@SanjayJog7) September 26, 2021
मुख्यमंत्र्यांनी घेतला होता आढावा
- नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे.
- या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज २६ सप्टेंबर रोजी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती.
- या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती.
- या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती दिली.
आजी-माजी-भावींचे सहभोजन!
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादविरोधी बैठकीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांसाठी सहभोजन ठेवले होते.
- केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत एकाच राऊंड टेबलवर पाच नेते भोजन आणि गप्पांचा आस्वाद घेत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
- या छायाचित्रात एकूण अमित शाहा, उद्धव ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाच नेते एकत्र बसलेले आहेत.
- शाहा यांच्या उजव्या हाताला शेजारीच उद्धव ठाकरे बसले आहेत. तर डाव्या हाताला शेजारी शिवराज चौहान बसले आहेत. नितीश कुमार समोरच बसले आहेत.
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्धव ठाकरेंकडे पाहत बोलताना दिसत आहेत.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही चौहान यांचं म्हणणं मन लावून ऐकताना दिसत आहेत.
- गृहमंत्री अमित शाहही त्यांचे बोलणे ऐकताना दिसत आहेत.
- खरंतर एवढ्या उघडपणे काही राजकीय समीकरणांची चर्चा होत नसते, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माजी, आजी, भावी वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर या सहभोजनावर खमंग चर्चा रंगणं स्वाभाविकच आहे.