मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या अपना सहकारी बँकेला ७९ लाखांचा दंड ठोठावला आहे. ही सहकारी बँक आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे.
बँकेने या सूचनांचे पालन केले नाही…
- रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१९ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत कायदेशीर तपासणी केली होती.
- रिझर्व्ह बँकेनुसार, तपासणी अहवालात असे दिसून आले आहे की एनपीए वर्गीकरण, मृत ठेवीदारांच्या चालू खात्यात पडलेल्या ठेवींवरील
- व्याज भरणे किंवा दाव्यांचा बंदोबस्त करणे आणि किमान शिल्लक न राखणे यासाठी चिंता व्यक्त केली.
- बचत बँक खात्यांमध्ये दंड लावण्याबाबतच्या सूचनांचे पालन केले गेले नाही
नोटिशीला दिलेले उत्तर पाहूनच दंड आकारला:
- यानंतर आरबीआयने अपना सहकारी बँकेला नोटीसही बजावली होती.
- निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल बँकेवर दंड का आकारला जाऊ नये याचे कारण सांगण्यास नोटीसमध्ये बजावले.
- रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, खासगी सुनावणीदरम्यान केलेल्या अतिरिक्त सबमिशन आणि तोंडी सबमिशन देखील विचारात घेण्यात आल्या.
- बँकेने नोटिशीला दिलेले उत्तर पाहूनच दंड आकारण्यात आलाय.
आरबीआयने स्पष्ट केले की, नियामक अनुपालनाअभावी दंड आकारण्यात आलाय आणि कोणत्याही व्यवहाराच्या वैधतेवर किंवा बँकेने आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही करारावर परिणाम होणार नाही.