मुक्तपीठ टीम
आरोग्य विभागाची शनिवार-रविवार (२५ सप्टेंबर – २६ सप्टेंबर) रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्ष भाजपादेखिल आक्रमक झाली आहे. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा उगीच गोरगरीब विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका अशी टीका भाजपाने केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा झालेलं आर्थिक नुकसान सरकारने भरून द्यावे अशी मागणी भाजपा आमदार राम सातपुते यांनी केली आहे.
या परीक्षेसाठी काही विद्यार्थी परीक्षेपूर्वीच परीक्षाकेंद्रावर पोहोचले होते, तर काही विद्यार्थी प्रवासात होते आणि अचानक परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
भाजपाचे आमदार राम सातपुते आक्रमक
- आज संपूर्ण महाराष्ट्रभर ही भरती परीक्षा होणार असल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत विद्यार्थ्यांनी एसटी, रेल्वेने प्रवास करत परीक्षा केंद्रावरती पोहोचलेले आहेत परंतु आत्ता अचानकपणे परीक्षा रद्द झालीय असं सांगितलं गेलं.
- त्यामुळे हे कर्मदरिद्री निष्ठूर सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलेले आहेत.
- गरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे.
- मी या सरकारला इशारा देतो की जर या सरकार मधील लोकांना जर सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या उबवायचं काम करु नये.
- त्यांनी राजीनामा देऊन घरी बसा.
- राज्यातील विद्यार्थ्यांचं वाटोळं करण्याचा ठेका ठाकरे सरकारने घेतलेला आहे.
- या सरकार मधील कोणी जाणते राजे वगैरे कोणी असतील त्या सगळ्यांचा मी निषेध करतो आणि सरकारमधल्या लोकांना लाज वाटत असेल तर त्यांनी हे सरकार स्वत:हून बरखास्त केलं पाहिजे.
आघाडीची पिछाडी! ऐनवेळी रात्री आरोग्य विभाग परीक्षा पुढे ढकलल्यानं संताप!