Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी एससी, एसटी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या सारखा कायदा करा”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी

September 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
chitra wagh

मुक्तपीठ टीम

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (एससी, एसटी अ‍ॅट्रॉसिटी) धर्तीवर कायदा बनवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी केली. या मागणीचे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत्या होत्या. यावेळी भारती चौधरी, त्रिशला हंचाटे, सुमिता सिंह, निर्मला सिंह उपस्थित होत्या.

chitra wagh

चित्रा वाघ यांनी सांगितले की, महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराची चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची सूचना करणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची अन्य राज्यातील घटनांशी तुलना करून मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत आपण आणि आपले सरकार किती असंवेदनशील आहे, हेच दाखवून दिले आहे.

chitra wagh

यावेळी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्ला चढवत सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरात अन्य राज्यातील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख केला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काय चालू आहे हे पहात बसण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चालू आहे हे मुख्यमंत्र्यांनी पहावे. महिलांवरील अत्याचारांचा विषय राजकारणापलीकडचा आहे याचे भानही मुख्यमंत्र्यांनी ठेवू नये हे दुर्दैवी आहे. महिलांवरील अत्याचाराची चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज काय असा सवाल उपस्थित करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना कसलीच चाड राहिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

 


Tags: BJPBJP chitra waghचित्रा वाघदिलीप वळसे पाटीलभाजपा
Previous Post

पेगॅसस व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरी प्रकरणात चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Next Post

“मुंबईसह राज्यातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये महिला सुरक्षारक्षक नेमा”

Next Post
nana patole

"मुंबईसह राज्यातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये महिला सुरक्षारक्षक नेमा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!