Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“एसटीपीचे काम सुरळीत होण्यासाठी जागा लवकरात लवकर शोधावी”: संजय बनसोडे

गंगापूर-खुल्ताबाद जलजीवन अभियान, वॉटर-ग्रीड, स्वच्छ भारत निर्माणच्या कामांची आढावा बैठक

September 22, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Sanjay Bansode

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत गंगापूर शहर भूमिगत गटार योजना प्रगतीपथावर आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी पाईप जोडणीसह चेंबर बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र एसटीपीच्या कामास स्थानिक नागरिक विरोध करीत असल्याने हे काम सुरळीत होण्यासाठी समन्वयाने जागा शोधून काढावी व तातडीने प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

 

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार संतोष माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जल जीवन अभियनाचे संचालक, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, एसटीपी आणि सिव्हर लाईनचे काम सध्या सुरु नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. येथील मुख्य अभियंता यांनी याबाबत पाठपुरावा करावा.

 

मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत जायकवाडी धरण क्षेत्रातील औरंगाबाद जिल्हयातील गंगापूर, वैजापूर या तालुक्यांना जायकवाडी धरणातून ग्रीड प्रस्तावित करण्यात आला आहे. पाण्याची उपलब्धता पाहून याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही बनसोडे यांनी यावेळी दिल्या.

 

गंगापूर वॉटर ग्रीड योजना

गंगापूर वॉटर ग्रीड योजनेच्या संदर्भात गंगापूर तालुक्याचा संपूर्ण वॉटर ग्रीडचा प्रस्ताव पीएमसी एजन्सीकडून तयार करुन तो जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तयार करणे व मंजुरीसाठी पाठविणे. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान योजनेचा आढावा

 

मागील आठवड्यातच पी एम सी एजन्सीची निवड करण्यात आलेली असून अजून ॲग्रीमेंट बाकी आहे या आठवड्यामध्ये अॅग्रीमेंट झाल्यानंतर खुलताबाद तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करुन त्यांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. गंगापूर तालुक्यातील ज्या योजना वॉटर ग्रीड योजनेत बसणार नाहीत त्या सर्व पीएमसी एजन्सी कडे प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी ठेवण्यात येतील.

 

जिल्हा परिषद औरंगाबाद येथील विविध योजनांवर असलेले पंप ऑपरेटर यांना शासनाकडून पगार देणेबाबत

  • सध्या महाराष्ट्रामध्ये चार जिल्हा परिषदांना पगारासाठी निधी देण्यात येत आहे. त्याचआधारे औरंगाबाद जिल्हा परिषद यांचादेखील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावा.
  • गंगापूर नगरपरिषद अंतर्गत सुरु असलेल्या मलनि:स्सारण योजनेच्या प्रगती व तक्रारीबाबत आढावा घेणे
  • शासन निर्णयाप्रमाणे प्रथम एसटीपी प्लांट बांधण्यात यावा नंतर उर्वरित भूमिगत गटार बांधण्यात यावी, लवकरात लवकर एसटीपी प्लांटसाठी योग्य ती जागा शोधून काम प्रगतिपथावर करावे, अशी सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी केली.

Tags: sanjay bansodeऔरंगाबादगंगापूर वॉटर ग्रीड योजनामराठवाडा वॉटर ग्रीडसंजय बनसोडे
Previous Post

“हजेरी सहाय्यकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार”

Next Post

अखेर ‘झी’चं ‘सोनी’सोबत विलीनीकरण! ‘झी’ आणि ‘सोनी’चं नेमकं काय ठरलं?

Next Post
Zee-Sony

अखेर ‘झी’चं ‘सोनी’सोबत विलीनीकरण! ‘झी’ आणि ‘सोनी’चं नेमकं काय ठरलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!