Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा”: उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 'सुधारित घटना मसुदा-२०२१' एकमताने मंजूर

September 22, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-२०२१’ एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सरकार्यवाह ॲड आस्वाद पाटील, सहकार्यवाह रविंद्र देसाई, कोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

 

गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकटकाळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे, त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्कतेने कार्यरत रहावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-२०२१’ बाबत चर्चा करून हा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarआमदार भाई जगतापउपमुख्यमंत्री अजित पवारगजानन किर्तीकरमहाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
Previous Post

भाजपाचे निलंबित १२ आमदार राज्यसभेला मत देऊ शकणार, पण विधानभवनाच्या आवाराबाहेर!!

Next Post

विद्रोहाचा दीपस्तंभ बाबुराव बागुल: सर्जनशील साहित्यिक, विद्रोही साहित्य चळवळीचे एक प्रवर्तक

Next Post
chalitale tower

विद्रोहाचा दीपस्तंभ बाबुराव बागुल: सर्जनशील साहित्यिक, विद्रोही साहित्य चळवळीचे एक प्रवर्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!