प्रसाद नायगावकर
यवतमाळमधील पत्रकार प्रसाद नायगावकर यांनी बेंबळा धरणाची ड्रोन दृश्यं पाठवली आहेत. शंभरपेक्षा जास्त एकरवर पसरलेल्या या धरणात पूर्ण क्षमतेनं पाणी भरतं तेव्हा त्याची भव्यता आकाशाशी स्पर्धा करणारी वाटते. वर पाहावं तर आभाळ दाटलेलं आकाश आणि खाली हे पाणेरी आकाश. बेबंला या महिन्यात पूर्ण क्षमतेनं भरलं.
हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. हे धरण तब्बल 113 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. एकूण 20 दरवाजे असून सध्या 10 दरवाजे उघडले आहेत.एकूण 29 मीटर खोल पातळी धरणाची आहे. या धरणाने जिल्ह्यातील बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव वणी पर्यंत जमीन सिंचनाखाली येत आहे. ड्रोनद्वारे कॅमेऱ्यात कैद केलेले दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.