Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात आता एका राज्यात सर्वपक्षीय सरकार! विरोधी बाकांवर एकही आमदार नाही!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Neiphiu Rio

मुक्तपीठ टीम

नागालँड हे देशातील एकमेव राज्य असेल जिथे सरकार विरोधी पक्षाशिवाय चालणार आहे. आपल्या राज्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये एकमत असावं या उद्देशाने विरोधातील पक्षांनीही बिनाशर्त सत्ताधारी होण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँड विधानसभेत आमदार असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी शनिवारी कोहिमामध्ये सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी सत्ताधारी आणि सर्व विरोधी पक्षांनी हातमिळवणी करून अंतिम मान्यता दिली. नव्या सत्ताधारी आघाडीला संयुक्त लोकशाही आघाडी UDF म्हटले जाईल. यात भाजपाचाही सहभाग आहे.

 

मुख्यमंत्री नेफिउ रिओ यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय

  • नागालँडचे मुख्यमंत्री नेफिउ रिओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांसह नव्या सत्ताधारी आघाडीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
  • याची माहिती मुख्यमंत्री नेफिउ रिओ यांनी ट्वीट करून दिली.
  • नागालँडमधील या नव्या आघाडीला संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीए) नाव देण्यात आले आहे.
  • एनडीपीपी, भाजपा, एनपीएफ आणि अपक्ष पक्षाचे नेते आणि आमदारांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

Neiphiu Rio

 

नागालँड सरकारच्या प्रवक्त्या नीबा क्रोनू यांनी पत्रकारांना सांगितले की, आमदार पुढील काही दिवसांत युडीएच्या स्थापनेसाठी सभापतींना पत्र लिहितील. नवीन सरकारला नागालँड युनायटेड गव्हर्नमेंट म्हणजेच नागालँड संयुक्त सरकार असे म्हटले जाईल अशी घोषणा पूर्वी करण्यात आली होती, परंतु क्रोनू म्हणाल्या की शनिवारच्या बैठकीत हे ठरवले गेले की नवीन सरकारला अधिक योग्यरित्या युडीए असे नाव दिले जाईल.

 

१ जुलै रोजी, मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या नागा पीपल्स फ्रंट (NPF) ने सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. मुख्यमंत्र्यांना यावर विचार करण्याचे आवाहन केले, जेणेकरून नागा समस्येवर संयुक्त तोडगा काढता येईल. सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने (एनडीपीपी) सुरुवातीला या निर्णयाचे कौतुक केले, परंतु भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते त्यावर फारसे खूश नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री रिओ यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला तयार केले आहे. त्यामुळे भाजपाही सत्ताधारी UDA मधील प्रमुख सहयोगी असेल.


Tags: BJPNagalandNeiphiu RioNPFoppositionनागालँडभाजपामुख्यमंत्री नेफिउ रिओ
Previous Post

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे: कामगारांचा शक्तिशाली पण संयमी, अष्टपैलू नेता!

Next Post

लसोन्माद! उपलब्ध लशी वाढदिवसाच्या मुहूर्तासाठी दाबून ठेवल्या?

Next Post
vaccination

लसोन्माद! उपलब्ध लशी वाढदिवसाच्या मुहूर्तासाठी दाबून ठेवल्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!