Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्लास्ट फर्नेस गॅसमधून उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडचा पुन्हा वापर करण्यासाठी टाटाद्वारे प्रकल्प विकसित

September 19, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
TaTa

मुक्तपीठ टीम

कोणत्याही मोठ्या पोलाद प्रकल्पात ब्लास्ट फर्नेस (बीएफ) गॅसमधून उत्सर्जित कार्बन डायऑक्साइड (सीओ -2) ही मोठी प्रदूषणकारी समस्या मानली जाते. पण सामाजिक दायित्व निभावण्यात सतत अग्रेसर असणाऱ्या टाटा समुहाने याही बाबतीत पुढचे पाऊल उचलले आहे. ब्लास्ट फर्नेस (बीएफ) गॅसमधून उत्सर्जित कार्बन डायऑक्साइड (सीओ -2) शोषण्यासाठी प्रकल्प विकसित करणारी टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे.

 

कंपनीचे सीईओ तसेच एमडी असणारे टी.व्ही नरेंद्रन यांच्या हस्ते या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

 

सीओ -2 प्रदूषण रोखणारी यंत्रणा आहे तरी कशी?

  • कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (सीसीयू) सुविधा, अमाईन आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करते.
  • कॅलरीफिक मूल्यासह कॅप्चर केलेला कार्बन डाय ऑक्साईड पुन्हा प्रकल्पाच्या गॅस नेटवर्कमध्ये पाठवला जातो.
  • या प्रकल्पाची क्षमता दररोज पाच टन आहे.
  • सर्क्युलर कार्बन अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा स्टील आपल्या प्रकल्पामधून येणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचा पुन्हा वापर करेल.
  • सध्या दररोज पाच टन कार्बन डाय ऑक्साईड घेतला जात आहे.
  • प्रात्यक्षिक यशस्वी झाल्यास कार्बन कॅप्चर प्रकल्पांची संख्या वेगाने वाढवण्याची योजना आहे.
  • ब्लास्ट फर्नेसमधून कार्बन डाय ऑक्साईड कॅप्चर केल्याने स्टील प्लांट कार्बनमुक्त तर बनतीलच पण, हायड्रोजन अर्थव्यवस्थेचा मार्गही खुला होईल.

कार्बन क्लीन नावाच्या संस्थेच्या तांत्रिक सहाय्याने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यासाठी, कंपनीने सप्टेंबर २०२० मध्येच कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेजसोबत जोडून देशातील पॅरिस कराराअंतर्गत डी-कार्बनायझेशनच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार केली आहे.

 

डी-कार्बनायझेशनच्या दिशेने उचलली पावले

  • उद्घाटन प्रसंगी बोलताना, एमडी टीव्ही नरेंद्रन म्हणाले की, आम्ही रणनीतिकदृष्ट्या डी-कार्बनायझेशनच्या दिशेने वाटचाल केली आहे.
  • भविष्यासाठी नवीन मानके ठरवण्यात येत आहेत.
  • विकसनशील देशांमध्ये, विशेषत: भारतासारख्या देशात पोलाद उद्योगाच्या शाश्वततेसाठी, मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साईड कॅप्चर करून आणि पुन्हा वापरून किफायतशीर उपाय शोधणे अत्यावश्यक आहे.
  • यामुळे कार्बन डाय ऑक्साईड गॅस उत्सर्जन कमी होईल, खर्च कमी होईल आणि प्रकल्पाला 0ऊर्जा मिळेल.
  • अशा प्रकल्पांमधून मिळालेला अनुभव भविष्यातील मोठे कार्बन प्लांट्स उभारण्यासाठी आवश्यक डेटासह मदत करेल.
  • कार्बन कॅप्चर प्लांटची संख्या वाढवली जाईल.

Tags: carbon furnessco2Indian companyTataTata steelकार्बन क्लीन
Previous Post

स्टार्ट-अप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांसाठी तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धा

Next Post

म्हाडामध्ये ५६५ जागांसाठी सरळ सेवा भरती, ऑनलाईन अर्ज करा!

Next Post
MHADA

म्हाडामध्ये ५६५ जागांसाठी सरळ सेवा भरती, ऑनलाईन अर्ज करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!