मुक्तपीठ टीम
आधी सांगितल्याप्रमाणे भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.याही वेळी ते ईडीकडेही तक्रार दाखल करणार आहेत. मात्र, यावेळी घोटाळाकरणात थोडा फरक आहे. प्रथमच सोमय्या आणि भाजपाला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याची रणनीती राष्ट्रवादीने ठरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोमय्यांच्या आरोपांनंतर मुश्रिम यांनी अब्रू नुकसानीचा खटल्याचा इशारा दिलाच पण महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या चिथावणीने आरोप होत असल्याने पाटलांवर आरोप करत रस्ते घोटाळ्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आणखी पुढे जात इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना आधी आपला मुलगा काय करतो हे पाहावं, असा हल्ला चढवणारा सल्ला सोमय्यांना दिला आहे. त्यामुळे आता भाजपा आणि आघाडीमधील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणातील घोटाळाकारण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्यांनी हसन मुश्रिफांवर कोणते आरोप केले?
- हसन मुश्रीफ आणि परिवाराने सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये १०० कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहे.
- मंगळवारी मी मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे.
- ईडीला 2700 पानांचे पुरावे देणार आहे.
- बुधवारी दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडेही हे सर्व पुरावे देणार आहे.
- ठाकरे सरकारची डर्टी इलेव्हन घोटाळ्यात राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे.
- माझ्याकडे दोन मंत्र्याच्या फाईल तयार होत्या.
- आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड केला. लवकरच दुसऱ्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार आहे.
मुश्रिफांवर बोगस शेल कंपन्यांचा आरोप
- राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत.
- फक्त तेव्हढेच नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणे, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे २७०० पानांचे पुरावे आहेत.
- ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत.
- बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले.
- सीआरएम सिस्टम प्रा. लि. ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत.
- यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे.
- ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे.
- नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे.
- त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, २ कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुश्रिफांच्या पत्नीवरही आरोप
- पत्नीच्या अकाऊंटमध्ये तीन लाख रुपयांचे शेअर
- बाप बेटे दोघांच्या १२७ कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत.
- हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे.
- २०१८-१९ मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या.
- बेनामी १२७ कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.
सोमय्यांच्या घोटाळ्यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे तसेच प्रत्युत्तर
हसन मुश्रिफ यांनी सोमय्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करतानाच त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचंही जाहीर केलं. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काही तरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी माझ्यावर बेनामी मालमत्तेचे आरोप केले आहेत, असा आरोप मुश्रिफांनी केला.
मुश्रिफांचा पाटलांवर आरोप आणि एफआयआरचा इशारा
- चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. राज्यातील ९० टक्के रस्ते बंद आहेत.
- कंत्राटदार पळून गेले आहेत.
- कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
- कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे
- समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू
सोमय्यांना माहिती नाही….
- इन्कम टॅक्स विभागाने अडीच वर्षापूर्वी माझ्या कार्यालयावर धाड टाकली होती.
- त्यानंतर अडीच वर्ष झाले तरी काहीच कारवाई केली नाही.
- आता सोमय्या यांनी उठून बेनामी संपत्तीचा आरोप केला आहे.
- कुठून शोध लावला त्यांनी? सोमय्या या बिचाऱ्याला काहीच माहीत नाही.
- त्यांनी आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी माहिती दिल्यावर हे आरोप केले.
- खरं तर त्यांनी कागल आणि कोल्हापूरला येऊन माहिती घ्यायला हवी होती.
- ते आले असते तर त्यांना माहिती मिळाली असती.
सोमय्यांवर दाव्याचा इशारा
- साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या, लोकांच्या पैशातून उभा राहिला असल्याचा दावाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी केला.
- सोमय्या हे माझी प्रतिमा डागळण्यासाठीच बोलत आहेत.
- माझ्यावर जेव्हा जेव्हा असे आरोप केले तेव्हा तेव्हा आरोप करणाऱ्यांवर मी ५० कोटींचे दावे केले आहेत.
- आता सातवा दावा करणार आहे. १०० कोटींचा दावा करणार आहे.
- माझ्या सतरा वर्षांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत माझ्यावर कधीच कोणता आरोप झाला नाही. उलट तुमच्या काळात अनेक घोटाळे झाले.
नबाव मलिकांचा सोमय्यांवर हल्ला, मुलाकडे लक्ष देण्याचा सूचक सल्ला!
- राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिहल्ला केला आहे.
- सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत.
- सोमय्यांनी इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना आधी आपला मुलगा काय करतो हे पाहावे.
- मुश्रिफ यांच्यावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली होती. त्यात त्यांना काही मिळाले नाही.
- दोन वर्ष झाली तरी या प्रकरणी कारवाई झाली नाही.
- सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने आहेत.
- इतरांच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्या.
- मुलगा कुणाला फोन करतो, कुणाला खंडणी मागतो, तुमचे नातेवाईक काय करतात, त्यांच्या किती बोगस कंपन्या आहेत, ते कसं मनी लॉन्ड्रिंग करतात हे पण लोकांना माहीत आहे.