मुक्तपीठ टीम
मुंबई येथील BIS अर्थात भारतीय मानक ब्यूरोने 09 सप्टेंबर 2021 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे भारतीय मानक 14543 नुसार ” बाटलीबंद पेयजलावर” ISI चिन्हाचा गैरवापर तपासण्यासाठी सक्तीचे छापे आणि जप्तीची कारवाई केली. भिवंडीमधील मेसर्स मदर बेव्हरेजेसवर टाकलेल्या छाप्यात भारतीय मानक ब्युरोच्या प्रमाणित चिन्हाचा (आयएसआय मार्क) गैरवापर आढळला.
मेसर्स मदर बेव्हरेजेस, वैध परवान्याशिवाय आणि CM/L.No-7200168205 आणि CM/L.No-3723560 सारखे विविध परवाना क्रमांक वापरून ZIP Aqua, Oxy Clear, Reeha, ZEF Aqua, OXYREO या ब्रँडचे सीलबंद पेयजल BIS चिन्हाचा गैरवापर करून विकत असल्याचे आढळले. या छाप्यात भारतीय मानक 14543: 2016 नुसार 1 लीटरच्या सुमारे 360 बाटल्या आणि 500 मिलीलिटरच्या 852 बाटल्या तसेच विविध प्रकारचे लेबल/स्टिकर्स जप्त करण्यात आली. बीआयएस मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकात श्री. अर्जुन.टी आणि श्री. निशिकांत सिंह या क वर्गाच्या शास्त्रज्ञांचा समावेश होता.
भारतीय मानक ब्यूरो कायदा 2016 नुसार भारतीय मानक ब्यूरोच्या मानक चिन्हांचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. अनेकदा असे आढळून आले आहे की बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी तयार करून विकली जातात. म्हणून, सर्वांना विनंती केली जाते की बीआयएस वेबसाइट http://www.bis.gov.in ला भेट देऊन किंवा बीआयएस केअर मोबाईल ऍप्लिकेशन वापरून खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर आयएसआय मार्कची सत्यता पडताळून पाहा.
नागरिकांना विनंती केली जाते की जर त्यांना कोणत्याही उत्पादनावर आयएसआय मार्कचा गैरवापर झाल्याचे आढळले तर त्यांनी त्याची माहिती प्रमुख, MUBO-II, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, BIS, मनकालय, E9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी ( पूर्व), मुंबई – 400 093 येथे कळवावी. अशा तक्रारी hmubo2@bis.gov.in या ई -मेलवरही करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.
जागा ग्राहक जागा!
कोणतीही खरेदी करण्यापूर्वी, उत्पादनावर ISI चिन्ह अस्सल असल्याची खात्री करा; http://www.bis.gov.in ला भेट द्या किंवा BIS CARE मोबाइल अॅप वापरा: भारतीय मानक ब्युरो