मुक्तपीठ टीम
स्वकमाईतून सामाजिक बांधिलकी जपणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने कोरोना काळातील निराशाग्रस्त वातावरणात श्री गणेश भक्तांना उभारी देण्यासाठी चांगलं पाऊल उचललं आहे. संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ संस्था एक दशकाहून अधिक काळ विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करत आहे. कोरोनाच्या कठीण काळात सर्वांनी जबाबदारीने आणि काळजीपूर्वक आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे स्वागत करावे याकरिता जिजाऊ संस्थेमार्फत ‘घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे सजावट स्पर्धा वर्ष २०२१’ आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिला पुरस्कार एक लाख अकरा हजार रुपये असलेल्या या स्पर्धेचे आयोजन कोरोना सुरक्षा नियमावली पाळत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आले आहे.
जिजाऊ संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणपती स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. त्याकरिता त्यांना काही सोप्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रथमतः सजावटीमधून समाजाला कोणता तरी चांगला संदेश मिळणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच, सजावटीचे (Decoration) दृश्य पूर्ण दिसेल असे ३ ते ५ फोटोज् आणि ३० सेकंदची क्लिप जिजाऊ संस्थेने दिलेल्या क्रमांकावर पाठवणे गरजेचे आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील लोकांना भाग घेणे शक्य असून, विजेत्यांना जिजाऊ संस्थेतर्फे भरघोस बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. ₹१,११,१११ प्रथम, ₹५५,५५५ द्वितीय आणि ₹२५,५५५ तृतीय क्रमांकाची रोख पारितोषिके असून सर्वांना १९ सप्टेंबर पर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेणे शक्य होणार आहे. गणेशोत्सवाची लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे, कोरोनाच्या परिस्थितीतही या उत्साही भाविकांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून जिजाऊ संस्थेने सामाजिक संदेश देण्याबरोबरच, सर्वांनी गणेशोत्सोव जल्लोषात साजरा करावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेची नियमावली
1. तुमच्या सजावटीचे (Decoration) पूर्ण दिसेल असे 3 ते 5 फोटोज् तुम्ही पाठवावे.
2. सजावटीसोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे देखील फोटोज् तुमच्या सोबत त्यामध्ये प्रामुख्याने असावे.
3. सजावटीचे फोटोज आणि विडिओ आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर ला टॅग करणे अनिवार्य आहे.
#Jijauganeshmahostav2021
#जिजाऊसामाजिक
#निलेशसांबरे
#जिजाऊमहोत्सव
#जिजाऊसामाजिक
#NileshSambare
#JijauMahotsav
4. तुमच्या संपूर्ण सजावटीचे आणि लाडक्या बाप्पाच्या मूर्तीची कमीतकमी 30 सेकंदची व्हिडिओ आम्हाला पाठवावी.
5. तुम्ही सदर व्हिडिओ तुमच्या मोबाईल फोन किंवा कॅमेरा या मधून घेऊ शकतात.
6. तुमच्या सजावटीमधून समाजाला कोणता तरी संदेश मिळावा हे खुप महत्वाचे आहे.
(विजेते तुम्ही दिलेल्या संदेश ह्यावर अवलंबून आहेत.)
स्पर्धा म्हटले की त्याचे बक्षीस देखील येणारच….🏆🏆
पहिलं पारितोषिक :- Rs. 1,11,111
दूसरे पारितोषिक :- Rs. 55,555
तिसरे पारितोषिक :- Rs. 25,555
स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ⏬ :-
https://forms.gle/fnLgJvxDRuGG12bD8
सजावटीचे फोटोज आणि विडिओ खालील नंबर वर पाठवावेत. ( आमचे स्वयंसेवक सदर फोटोज आणि विडिओ ची खात्री जमा करण्यासाठी आपण दिलेल्या पत्त्यावर भेट देऊ शकतात)
*अधिक माहिती साठी खालील क्रमांकावर संपर्क करा *📱 :-
पंकज पांडुरंग पवार
समन्वयक-जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र
77988 56788 / 7972358309
मितेश घाडी – 85912 87083
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था – अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://nileshsambare.org/
आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
फेसबुक – https://www.facebook.com/nileshsambare17/
इन्स्टाग्राम – https://instagram.com/nilesh_sambare_official?utm_medium=copy_link
ट्विटर – https://twitter.com/sambare_nilesh?s=11
तुमच्या डेकोरेशन चे फोटोज आणि विडिओ खालील दिलेल्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट ला टॅग करा.
आमच्या सोशल मीडिया वर टॅग करताना कृपया खालील हॅशटॅग वापरा
#Jijauganeshmahostav2021
#जिजाऊसामाजिक
#निलेशसांबरे
#जिजाऊमहोत्सव
#जिजाऊसामाजिक
#NileshSambare
#JijauMahotsav
स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२१ आहे.