मुक्तपीठ टीम
जियोफोन नेक्स्ट हा ठरल्या तारखेला लाँच झाला नसला तरी तो लवकरच आपल्या हाती येणाराय. त्याची घोषणा आधीच केले गेले होते, परंतु आता त्याचे सर्व फिचर्स आणि किंमत उघड होणे बाकी आहे. हा जगातील सर्वात स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन असेल असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे. देशातील ४५० दशलक्ष २ जी वापरकर्त्यांपर्यंत हा स्मार्टफोन पोहोचवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. तो साधारणत: साडे तीन हजारापर्यंत येईल, असा अंदाज आहे.
जगातीस सर्वात स्वस्त स्मार्टफोनसाठी गुगल-रिलायन्स एकत्र
- जियोफोन नेक्स्ट गुगलच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.
- फोनचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षेची जबाबदारी गुगलची असेल.
- फोन लाँच करताना गुगल चे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, “या स्मार्टफोनला सतत अपडेट्स मिळतील. याव्यतिरिक्त, फोनला जागतिक दर्जाची सुरक्षा आणि मालवेअर संरक्षण देखील मिळेल.”
जियोफोन नेक्स्टचे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
- जियोफोन नेक्स्टची किंमत ३,४९९ रुपये असेल.
- फोनमध्ये ५.५ इंच एचडी डिस्प्ले, १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि २५००एमएएच ची बॅटरी मिळेल.
- जियोफोन नेक्स्ट हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे हा दावा नक्की तसाच असेलच असे सांगता येत नाही.
- ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर असे दोन ४जी स्मार्टफोन आहेत, ज्यांची किंमत ३,४९९ रुपयांपेक्षा कमी आहे.
जियोफोन नेक्स्टच्या बॅटरीवर आक्षेप
जेव्हा या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन सोशल मीडियावर समोर आले, तेव्हा लोकांनी त्यात उपलब्ध असलेली बॅटरी खूप कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
जियोफोन नेक्स्टचा भारतात काय परिणाम होईल?
मुकेश अंबानी एजीएम दरम्यान फोन लॉन्च करताना म्हणाले की, ‘२जी विथ ५जी’. म्हणजेच त्यांना देशातील २जी ग्राहकांना ५जी मध्ये सेवा द्यायची आहे. सध्या देशात साडेचार कोटी मोबाइल यूजर्स आहेत जे स्मार्टफोन वापरत नाहीत. रिलायन्स जियो आणि गुगलचा फोकस या लोकांवर आहे. भारतातील लोकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी इंटरनेटशी जोडणे आवश्यक आहे. यासाठी रिलायन्सचा परवडणारा जियोफोन नेक्स्ट हा एक मजबूत दुवा असल्याचे सिद्ध होईल.