मुक्तपीठ टीम
प्राप्तिकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) ७ जून, २०२१ रोजी सुरू करण्यात आले.तेव्हापासून करदात्यांनी आणि व्यावसायिकांनी पोर्टलमध्ये आलेल्या समस्या आणि अडचणी नोंदवल्या आहेत. या प्रकल्पासाठी ठराविक सेवा प्रदाता असलेल्या इन्फोसिस लिमिटेडकडून करण्यात येत असलेल्या समस्यांच्या निवारणावर वित्तमंत्रालय नियमित देखरेख ठेवून आहे. आता मात्र या पोर्टलमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे आता करदात्यांकडून पोर्टलचा वापर अधिकाधिक वाढत आहे.
आयटी पोर्टलचा वाढता वापर
- अनेक तांत्रिक मुद्द्यांची उत्तरोत्तर दखल घेतली जात आहे आणि पोर्टलवरील विविध प्राप्तिकर संबंधित भरणा झालेल्या अर्जाच्या आकडेवारीमध्ये सकारात्मक कल दिसून आला आहे.
- ७ सप्टेंबर, २०२१ पर्यंत ८.८३ कोटीहून अधिक आणि सप्टेंबर, २०२१ मध्ये दैनंदिन सरासरीनुसार १५.५५ लाखांपेक्षा अधिक विशेष करदात्यांनी लॉग इन केले.
- सप्टेंबर, २०२१ मध्ये दररोज ३.२ लाख आणि मूल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी १.१९ कोटी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल झाली.
- त्यापैकी ७६.२ लाखांहून अधिक करदात्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा उपयोग केला आहे.
- केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राद्वारे प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या ९४.८८ लाखांहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रांची ई-पडताळणी देखील करण्यात आली आहे.
- यापैकी ७.०७ लाख प्राप्तिकर विवरणपत्रांवर प्रक्रिया करण्यात आली आहे., हे उत्साहवर्धक आहे.
- चेहरा विरहित मूल्यांकन /अपील/दंडात्मक कार्यवाही अंतर्गत विभागाने जारी केलेल्या ८.७४ लाख नोटिसा करदात्यांना पाहता येत आहेत, ज्याला २.६१ लाखांहून अधिक प्रतिसाद दाखल झाले आहेत.
ई-पोर्टलमाध्यमातून नोटिसाही!
- ई-कार्यवाहीसाठी सरासरी ८,२८५ नोटिसा दिल्या जात आहेत आणि सप्टेंबर, २०२१ मध्ये दररोज ५,८८९ प्रतिसाद दाखल केले जात आहेत.
- १०.६० लाखांहून अधिक वैधानिक अर्ज दाखल केले गेले आहेत ज्यात ७.८६ लाख टीडीएस स्टेटमेंट्स, ट्रस्ट/संस्थांच्या नोंदणीसाठी १० ए चे १.०३ लाख अर्ज , पगाराच्या थकबाकीसाठी १० ई 0.८७ लाख अर्ज , अपीलासाठी ०.१० लाख अर्ज ३५ यांचा समावेश आहे.
- ६६.४४ लाख करदात्यांनी आधार- पॅन संलग्न केले आहे. आणि १४.५९ लाखांहून अधिक ई-पॅन वाटप करण्यात आले आहेत.
- सप्टेंबर २०२१ मध्ये दररोज ०.५० लाखांहून अधिक करदात्यांकडून या दोन सुविधांचा लाभ घेतला जात आहे.
करदात्यांना सहजपणे अर्ज दाखल करता यावा यासाठी विभाग इन्फोसिसच्या सतत संपर्कात आहे याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.