Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#शेतकरीआंदोलन प्रजासत्ताक दिनी तिरंग्यासह २ लाख ट्रॅक्टर्सची परेड!

अखेर पोलिसांनी परवानगी दिली, राज्याराज्यांमधून ट्रॅक्टर्ससह दिल्लीकडे कूच

January 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farmer Tractors parade -6

मुक्तपीठ टीम

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक भाग असणाऱ्या २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. शनिवारी यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. तर शेतकऱ्यांसोबत आमची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी अनिल मित्तल यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलक प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रध्वजासह ही परेड काढणार आहेत. शेतकरी आंदोलनाकडून पोलिसांना लेखी योजना देण्यात आली असून त्यावर आज अधिकृत निर्णय अपेक्षित आहे. सध्या पोलिसांनी तत्वत: मान्यता दिली आहे.

 

प्रजासत्ताक दिन परेडनंतर शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड

दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड संपन्न झाल्यावर दुपारी १२ वाजता या ट्रॅक्टर परेडला सुरुवात होईल. ट्रॅक्टर परेड दिल्लीच्या वेगवेगळ्या परिसरातून जाणार असल्याने शेतकरी संघटनांकडून नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या ट्रॅक्टर परेडमध्ये २ हजार ५०० स्वयंसेवक तैनात असतील. वाढणारी गर्दी लक्षात घेता स्वयंसेवकांचीही संख्या वाढवली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या ट्रॅक्टर परेडनंतर आंदोलनाची पुढची रणनिती ठरवली जाईल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे.

 

परेडमध्ये २ लाखाहून अधिक ट्रॅक्टरचा समावेश

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये २ लाखाहून अधिक ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. या परेडचे ५ मार्ग असतील. दिल्ली पोलिसांनी या ट्रॅक्टर परेडला परवानगी दिल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाचे नेते अभिमन्यू कोहाड यांनी केला आहे. ही ट्रॅक्टर परेड दिल्लीच्या गाजीपूर, सिंघू आणि टीकरी सीमांवरुन सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

कसं असेल ट्रॅक्टर परेडचं नियोजन?

  • प्रत्येक मार्गावर शेतकरी ट्रॅक्टरमधून १०० किमीचा प्रवास करतील.
  • ७० ते ७८ टक्के मार्ग हे दिल्लीतले असतील तर उर्वरीत राजधानी दिल्लीच्या बाहेरचे असतील
  • सिंघू सीमेवरुन सुरु होणाऱ्या ट्रॅक्टर परेडचा एक मार्ग गांधी ट्रान्सपोर्टनगर असेल
  • याठिकाणाहून ही परेड कंझावाल आणि बवाना परिसरातून जाईल
  • टीकरी सीमेवरुन सुरु होणाऱ्या परेडचा मार्ग हा नांगलोई, नजफगढ़, बादली आणि कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवे असा असेल
  • सीमांवर लावले गेलेले अडथळे २६ जानेवारीला हटवले जातील आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड काढता येईल

 

 


Tags: Farmer Delhi Protestfarmer tractor marchFarmer tractor rallyदिल्ली शेतकरी आंदोलनशेतकरीशेतकरी ट्रॅक्टर परेडशेतकरी ट्रॅक्टर मोर्चा
Previous Post

दर मिनिटाला एक बलात्कार! बेटी नाहीच भारतात सुरक्षित!!

Next Post

#व्हाअभिव्यक्त शेतकऱ्यांवरील संकटाला महिने उलटले, व्यवस्थेला जाग काही येईना!

Next Post
nanded farmer

#व्हाअभिव्यक्त शेतकऱ्यांवरील संकटाला महिने उलटले, व्यवस्थेला जाग काही येईना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!