Saturday, May 24, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ

September 9, 2021
in featured, Trending, सरकारी बातम्या
0
PM Modi increased rubby msp

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व  रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

शेती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकारने रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत मसूर ,रॅपसीड आणि मोहरी  (प्रत्येकी 400 रुपये प्रति क्विंटल) आणि हरभरा (130 रुपये प्रति क्विंटल) या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत सर्वाधिक संपूर्ण  वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे .करडईच्या बाबतीत, हमीभावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल 114 रुपयांची वाढ झाली आहे.विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, विविध पिकांसाठी वेगवेगळी किमान आधारभूत किंमत देण्याचा उद्देश आहे.

रब्बी पीक  किमान आधारभूत किंमतवाढीनं काय होणार?

  • विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देणे हे किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचे उद्दिष्ट
  • गहू, रॅपसीड आणि मोहरी या तेल बियांसह मसूर, हरभरा, बार्ली आणि करडई या पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक मोबदला मिळण्याचा अंदाज
  • तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमत निर्धारित
  • रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतील वाढ शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे सुनिश्चित करेल

 

विपणन हंगाम 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (रु. क्विंटलमध्ये)

पीके MSP for RMS 2021-22

 

MSP for RMS 2022-23

 

Cost* of production 2022-23 Increase in MSP

(Absolute)

Return over cost (in per cent)
गहू 1975 2015 1008 40 100
जव 1600 1635 1019 35 60
चणा 5100 5230 3004 130 74
मसूर 5100 5500 3079 400 79
राई 4650 5050 2523 400 100
सूर्यफुल बिया 5327 5441 3627 114 50

* सर्वसमावेशक खर्चाचा संदर्भ देत, मजुरांची मजुरी , बैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि अन्य  कामांची मजुरी , भाडेतत्वार घेलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क यासारख्या भौतिक साहित्याच्या  वापरावर झालेला खर्च,अवजारे आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावर व्याज, पंप संच इत्यादींसाठी डिझेल/वीज इ., विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमांचे मूल्य याचा सर्व देय खर्चामध्ये  समावेश आहे.

 

शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर मोबदला मिळावा या उद्देशाने, किमान आधारभूत किंमतीत देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या दीडपट वाढ निश्चित करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये करण्यात आली होती या घोषणेच्या अनुरूप,  रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा हा निर्णय  घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर अपेक्षित मोबदला गहू , रॅपसीड आणि मोहरी (प्रत्येकी 100%) त्यानंतर मसूर (79%); हरभरा (74%); जव (बार्ली) (60%); करडई (50%)या पिकांच्या  बाबतीत सर्वाधिक मिळण्याचा अंदाज आहे.

मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिके घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  तसेच  सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि शेती पद्धतींचा अवलंब करण्याच्या दृष्टीने तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमतीची  पुनर्रचना करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये एकत्रित प्रयत्न करण्यात आले.

याव्यतिरिक्त, खाद्यतेल-पामतेल राष्ट्रीय अभियान (NMEO-OP), हे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली केंद्रीय पुरस्कृत योजना असून  खाद्यतेलांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यास आणि आयातीवरील  अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. या योजनेसाठी  11,040 कोटी रुपयांची तरतूद असून यामुळे पीक क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती वाढविण्यास मदत करेल.

2018 मध्ये सरकारने जाहीर केलेली “प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान” (PM-AASHA) ही एकछत्री योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मोबदला देण्यास सहाय्य्यकारी ठरेल. एक छत्री योजनेमध्ये प्रायोगिक तत्वावर तीन उपाययोजना म्हणजेच किंमत आधारभूत योजना पीएसएस), किंमत किमान देय योजना (पीडीपीएस) आणि खाजगी खरेदी आणि साठवणूक योजना (पीपीएसेंस) यांचा समावेश आहे.

 


Tags: farmersPM Narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीशेतकरी
Previous Post

राज्यात ४,१७४ नवे रुग्ण! मुंबई पाचशेवर, पुणे, नगर टेन्शनचेच!! ९ जिल्ह्यांमध्ये शून्य रुग्ण!!!

Next Post

अयोध्या ते रामेश्वरम…खास रामायण सर्किट ट्रेन! रामायणातील स्थळांचं एकाच फेरीत दर्शन!

Next Post
ramayan

अयोध्या ते रामेश्वरम...खास रामायण सर्किट ट्रेन! रामायणातील स्थळांचं एकाच फेरीत दर्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!