मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान युनिलिवर कंपनी (HUL) ने त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किंमतीत ३.५ टक्क्यांहून १४ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. परिणामी, सर्फ एक्सेल, रिन या कपडे धुण्याच्या उत्पादनांपासून ते अगदी लाईफब़ॉय या आंघोळीच्या साबणांपर्यंतच्या किमतीत वाढ झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात या उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र आता किंमती वाढल्याने सामान्यांच्या खिशाला गॅस, पेट्रोल दरवाढीनंतर पुन्हा एकदा कात्री बसली आहे. HUL च्या सर्फ एक्सेज इजीच्या १ किलो पॅकेटची किंमत आता १०० रुपयांवरुन ११४ रुपयांवर पोहोचली आहे.
तसंच चारचाकी वाहनं घेण्याच्या विचारात असाल, त्यात मारुती सुझुकीचा विचार करत असाल तर या कारच्या किंमतीतही १.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षात तिसऱ्यांदा मारुती सुझुकीने त्यांनी उत्पादनांची किंमत वाढवली आहे.
HUL उत्पादनांच्या का वाढल्या किंमती?
- कच्च्या मालाची मागणी वाढल्याने दबाव वाढव असल्याचं युनिलिव्हरचं म्हणणं आहे.
- परिणामी HUL च्या कपड्याच्या साबणांपासून ते त्वचेच्या साबण, फेसवॉशच्या किमंती वाढल्या आहेत.
आणखी कोणत्या उत्पादनांच्या किंमती वाढणार?
- व्हील डिटर्जंटची किंमत ३.५ टक्क्यांनी वाढली आहे.
- १ किलो व्हील पावडर आता ५६ रुपयांवरुन ५८ रुपयांना मिळेल.
- रिन पावडरच्या किंमतीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- रिन साबणाची किंमतही ६.२५ टक्क्यांनी वाढली आहे.
- लक्स साबणाच्या किंमती आता ८ वरुन १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मारुती सुझुकीही महागली!
- कंपनीने २०२१ मध्ये जानेवारी आणि एप्रिलमध्ये उत्पादनांच्या किंमतीत एकूण ३.५ टक्क्यांची वाढ केली आहे.
- महागाईचा फटका हा कच्च्य़ा मालालाही बसला आहे.
- सद्यस्थितीत मारुती सुझुकी एंट्री लेव्हल हॅचबॅक ऑल्टोपासून एसयूव्ही एस क्रॉसपर्यंतच्या मॉडेलची विक्री करतं.
- याच्या किंमती २.९९ लाखांपासून १२.३९ लाखांपर्यंत आहे.
- किंमती वाढवणं गरजेचं आहे, असे संकेत मागच्या महिन्यात कंपनीने दिले होते.
- मागच्या वर्षी मे, जूनच्या तुलनेत यावर्षी कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये ३८ रुपये प्रति किलोवरुन ६५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे.