मुक्तपीठ टीम
अंबानी म्हटले की दरवेळी नाक मुरडलेच पाहिजे असे नाही. काहीवेळा व्यावसायिक गरजेपोटी का होईना मोठे उद्योगसमूह जी पावलं उचलतात त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचाही फायदाच होतो. आता जिओमुळे देशात झालेल्या डेटा क्रांतीचेच पाहा. एकेकाळी १६० रुपयांना एक जीबी मिळणारा डेटा आता अवघ्या दहा रुपयांपेक्षाही कमी दरात मिळतो. त्यामुळे इंटरनेट यूजर्सची संख्या झपाट्यानं म्हणजे तब्बल तेराशेपट वाढली आहे. तर अनेकांना व्यवसायाचे नवे मार्ग सापडले आहेत.
जियोने घडवलेली डेटा क्रांती
- ५ सप्टेंबर २०१६ रोजी जियो लाँच केल्यावर मुकेश अंबानींनी “डेटा इज न्यू ऑइल” हा नारा दिला आणि या क्षेत्रात बदल घडवला.
- ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ साठी टीआरएआयच्या परफॉर्मन्स इंडिकेटर अहवालानुसार प्रत्येक यूजरमागे डेटाचा वापर केवळ ८७८.६३ एमबी होता.
- सप्टेंबर २०१६ मध्ये जियो लाँच झाल्यानंतर, डेटा वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आणि डेटा वापर १३०३ टक्क्यांनी वाढून प्रत्येक यूजरमागे १२.३३ जीबी झाली.
- जियोने बाजारात प्रवेश केल्यानंतर, केवळ डेटाचा वापरच वाढला नाही तर डेटा यूजर्सच्या संख्येतही मोठी वाढ झाली.
Celebrating #5YearsOfJio🥳
5 years of Digital Revolution.Thank you for being a part of this journey.#WithLoveFromJio#JioDigitalLife #DigitalIndia #Jio #Birthday pic.twitter.com/B09xIlx4iv
— Reliance Jio (@reliancejio) September 5, 2021
जियोचे कमी दर, डेटा क्रांतीचे एक कारण!
- जियोने बाजारात कमी केलेले डेटा दर हेही डेटा क्रांतीसाठी महत्वाचे कारण ठरले.
- जियो लाँच होण्यापूर्वी भारतात एक जीबी डेटाची किंमत सुमारे १६० रुपये प्रति जीबी होती, जी २०२१ मध्ये प्रति जीबी १० रुपयांपेक्षा कमी झाली.
- म्हणजेच, गेल्या ५ वर्षांत देशातील डेटाच्या किंमती ९३%ने कमी झाल्या आहेत.
- डेटाच्या कमी झालेल्या किमतींमुळे, आज जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट देणाऱ्या देशांच्या यादीत आपला देश आहे.
- जेव्हा डेटाच्या किंमती कमी होतात तेव्हा डेटाचा वापर वाढतो आणि जेव्हा डेटाचा वापर वाढतो, तेव्हा स्वाभाविकच ग्राहकांप्रमाणेच सर्वच व्यावसायिकांना मोठा फायदा होत असतो.
Celebrating #5YearsOfJio🥳
5 years of Digital Revolution.Thank you for being a part of this journey.#WithLoveFromJio#JioDigitalLife #DigitalIndia #Jio #Birthday pic.twitter.com/B09xIlx4iv
— Reliance Jio (@reliancejio) September 5, 2021
जियोमुळे इंटरनेट सर्वासामान्यांच्या आवाक्यात!
- आज देशात ५३ युनिकॉर्न कंपन्या आहेत ज्यांची जियो येण्याआधी १० संख्या होती.
- ई-कॉमर्स, ऑनलाईन बुकिंग, ऑर्डर प्लेसमेंट, ऑनलाईन मनोरंजन, ऑनलाइन क्लासेस यासारख्या सुविधा पूर्वी श्रीमंत किंवा फारतर मध्यमवर्गीयांची मिरासदारी होती. आता तसे नाही.
- आज रेल्वे बुकिंग, फुड सप्लाय, सिनेमा नाटक तिकिट, ग्रोसरी, खरेदी, ऑनलाइन शिक्षण अशा सर्वच बाबतीत जिओच्या डेटा स्वस्ताईमुळे फायदा होत आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात या साऱ्या सुविधा आहेत.
- झोमॅटोच्या सीईओंनी कंपनीच्या आयपीओ लिस्टिंगच्या महत्त्वपूर्ण दिवशी रिलायन्स जिओचे आभार मानले.
- नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हेस्टिंग्ज यांना आशा व्यक्त केली की, जिओसारखी कंपनी प्रत्येक देशात उपलब्ध होईल आणि डेटा स्वस्त होईल.