मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने आणखी एक विक्रम केला आहे. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय कॉलेजियमने १२ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. कॉलेजियमने ४४ सरकारी वकील आणि २४ न्यायालयीन अधिकाऱ्यांसह ६८ नावांची शिफारस केली आहे.
कॉलेजियमच्या दोन बैठकांमध्ये ८६ नावे ठरली
- कॉलेजियमची २५ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठका झाल्या.
- न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय कॉलेजियमने न्यायाधीश नेमणुकांवर विचार केला.
- उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी ११२ उमेदवारांचा विचार करण्यात आला.
- कॉलेजियमने नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या ६८ नावांपैकी ४४ वकील आणि २४ जिल्हा न्यायाधीश दर्जाचे वरिष्ठ न्यायिक अधिकारी आहेत.
ही शिफारस अशा वेळी आली आहे जेव्हा उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची तीव्र कमतरता आहे. केंद्राने मंजूर केल्यास, अलाहाबाद, राजस्थान, कलकत्ता, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, मद्रास, मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा, केरळ, छत्तीसगड आणि आसाम या उच्च न्यायालयांमध्ये ६८ न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल.
कॉलेजियमने १० महिला उमेदवारांना विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. त्यापैकी मार्ली वानकुंग या मिझोराममधील पहिल्या महिला न्यायिक अधिकारी आहेत. त्यांना गुहाटी उच्च न्यायालयात नियुक्त केले गेले आहे.