मुक्तपीठ टीम
टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने एक चांगली बातमी दिली आहे. त्यांनी 5जी वातावरणात भारताच्या पहिल्या क्लाउड गेमिंग सेशनची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी गुरूग्राममधील मानेसर येथे झाली. चाचणी दरम्यान, कंपनीने डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने वितरीत केलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करत ही चाचणी घेतली. भारती एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) रणदीप सेखोन यांनी सांगितले की, “मोबाइल गेमिंग हा एक नवीन ट्रेंड आहे आणि क्लाउड गेमिंगच्या लोकप्रियतेमध्ये 5जीचा मोठा वाटा असणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना हाय स्पीडचा आनंद घेता येईल. ही एक जबरदस्त डिजिटल प्रवासाची सुरुवात आहे.
क्लाउड गेमिंगचे फायदे
- क्लाउड गेमिंगमध्ये ग्राहक रिअल टाइम गेमिंगचा आनंद घेऊ शकतील. तसेच, यासाठी ग्राहकांना अधिक जीबी असलेले गेम डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय, गेमिंग हार्डवेअरवरही कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही.
- क्लाउड गेमिंगची यशस्वी चाचणी झाली. ते सामान्यांमध्ये सहजपणे पसरेल. जिथे ग्राहक त्यांच्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर हाय-एंड कन्सोल लाइट गेमिंगचा आनंद घेऊ शकतील.
- भारतात मोबाइल गेमिंगचा बाजार जवळजवळ 2.5 अब्ज आहे.
- सध्या भारतात अंदाजे 436 दशलक्ष ऑनलाइन गेमर्स आहेत. ज्यांची संख्या 2022 मध्ये 510 दशलक्ष पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
एअरटेलने 5जी क्लाउड गेमिंगच्या चाचणीसाठी मॉर्टल (नमन माथूर) आणि मॅम्बा (सलमान अहमद) या दोन लोकप्रिय गेमर्ससोबत भागीदारी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, एअरटेलने हैदराबादमध्ये थेट 4जी नेटवर्कवर 5जी सेवेची यशस्वी चाचणी घेतली. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये 5जी ची चाचणी एअरटेल करत आहे. यामध्ये एरिक्सन आणि नोकिया या कंपनी एअरटेलसह भागीदार आहेत.