Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात 5जी तंत्रज्ञानासह पहिल्यांदाच क्लाउड गेमिंग सेशनची यशस्वी चाचणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
airtel

मुक्तपीठ टीम

टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने एक चांगली बातमी दिली आहे. त्यांनी 5जी वातावरणात भारताच्या पहिल्या क्लाउड गेमिंग सेशनची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी गुरूग्राममधील मानेसर येथे झाली. चाचणी दरम्यान, कंपनीने डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने वितरीत केलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करत ही चाचणी घेतली. भारती एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) रणदीप सेखोन यांनी सांगितले की, “मोबाइल गेमिंग हा एक नवीन ट्रेंड आहे आणि क्लाउड गेमिंगच्या लोकप्रियतेमध्ये 5जीचा मोठा वाटा असणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना हाय स्पीडचा आनंद घेता येईल. ही एक जबरदस्त डिजिटल प्रवासाची सुरुवात आहे.

 

क्लाउड गेमिंगचे फायदे

  • क्लाउड गेमिंगमध्ये ग्राहक रिअल टाइम गेमिंगचा आनंद घेऊ शकतील. तसेच, यासाठी ग्राहकांना अधिक जीबी असलेले गेम डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय, गेमिंग हार्डवेअरवरही कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही.
  • क्लाउड गेमिंगची यशस्वी चाचणी झाली. ते सामान्यांमध्ये सहजपणे पसरेल. जिथे ग्राहक त्यांच्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर हाय-एंड कन्सोल लाइट गेमिंगचा आनंद घेऊ शकतील.
  • भारतात मोबाइल गेमिंगचा बाजार जवळजवळ 2.5 अब्ज आहे.
  • सध्या भारतात अंदाजे 436 दशलक्ष ऑनलाइन गेमर्स आहेत. ज्यांची संख्या 2022 मध्ये 510 दशलक्ष पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

 

एअरटेलने 5जी क्लाउड गेमिंगच्या चाचणीसाठी मॉर्टल (नमन माथूर) आणि मॅम्बा (सलमान अहमद) या दोन लोकप्रिय गेमर्ससोबत भागीदारी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, एअरटेलने हैदराबादमध्ये थेट 4जी नेटवर्कवर 5जी सेवेची यशस्वी चाचणी घेतली. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये 5जी ची चाचणी एअरटेल करत आहे. यामध्ये एरिक्सन आणि नोकिया या कंपनी एअरटेलसह भागीदार आहेत.

 


Tags: 5G cloud gaming session5जी क्लाउड गेमिंगairtelभारती एअरटेल
Previous Post

राज्यात ४ हजार ३१३ नवे रुग्ण! पुणे, नगर, सातारा, मुंबईवर लक्ष!

Next Post

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार!

Next Post
eknath shinde

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!