मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यात तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सण घरात राहूनच साजरे करा, असं केंद्र सरकारने बजावलं आहे. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचं आवाहनही केंद्राने केलं आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या बाबतीत काळजी घेण्याचं आवाहन करत असताना राज्यातल्या भाजपाची मात्र वेगळीच भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राज्य भाजपा विरुद्ध राज्य सरकार असा स्थानिक संघर्ष भडकतच जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारचा इशारा
- देशातली कोरोनाची स्थिती अजूनही वाईटच आहे. त्यामुळे घरात राहूनच सणवार साजरे करा.
- कोरोना नियमांचं पालन करा.
- लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्या.
- डेल्टा प्लसचे जवळपास ३०० रुग्ण आढळलेले आहेत.
देशातली कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे?
- २४ तासात ४७ हजार ९२ नवे रुग्ण आढळलेत.
- एकूण ३ लाख ८९ हजार ५८३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
- केरळमधली स्थिती चिंताजनक आहे. एकट्या केरळमध्ये कोरोनाचे ३२ हजार ९२ रुग्ण आहेत.
- केरळमध्ये आतापर्यंत ४१ लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
- २४ तासात ६५ लाख ६५ हजार नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
- आतापर्यंत एकूण ६६ कोटी ८९ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
- देशातल्या ५४ टक्के नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस झाला आहे.
- देशातल्या १६ नागरिकांचे कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस झाले आहेत.
राज्य भाजपा – राज्य सरकार संघर्षाचे मुद्दे
दहीहंडी सार्वजनिकरीत्या साजरी करण्यावरून भाजपा, मनसे विरुद्ध आघाडी सरकार असा वाद चांगलाच रंगला.
बैलगाडा शर्यती
ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती लोकप्रिय असतात. पण कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आयोजित करण्यावर बंदी आहे. तसे असतानाही भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे समर्थन केले.
बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही पूर्णपणे सोबत आहोत.
यासाठी पुढील काळात सर्व ते प्रयत्न करू!
यासंदर्भात शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद…https://t.co/WJrYgK9K5W pic.twitter.com/aKJ2BPEIym— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021
मंदिर प्रवेश
भाजपाने मंदिर प्रवेशासाठी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. मनसेही राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर या मुद्द्यावर आक्रमक आहे.
मंदिर प्रवेशावरून आक्रमक झालेल्या भाजपाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या आदेशाकडे भाजपाचे लक्ष वेधले. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर देताना अन्य राज्यातील मंदिरं उघडल्याचे दाखले दिले. तसेच मंदिरं खुली करण्यावरून आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर दोषारोपण बंद करा, असा टोला लगावला.
बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही पूर्णपणे सोबत आहोत.
यासाठी पुढील काळात सर्व ते प्रयत्न करू!
यासंदर्भात शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद…https://t.co/WJrYgK9K5W pic.twitter.com/aKJ2BPEIym— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021