मुक्तपीठ टीम
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत लंडनमध्ये आहे. पण तेथेही ती मुंबईला विसरलेली नाही. तेथून मुंबईच्या काळजीपोटी अनुष्काने एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये तिने सर्व मुंबईकरांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत बरेच लोक मास्कशिवाय बाहेर फिरत असताना पोलिसांनी पकडले गेले आहेत. तर त्याचवेळी मुंबईतील नवे कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंताही व्यक्त होत आहे.
विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदारांना आवाहन
- मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर एक ग्राफिक्स शेअर केले आहे.
- ज्यामध्ये मास्कशिवाय किती लोकांना पकडले गेले हे दिसून येते.
- कोरोना पुन्हा वाढण्याची चिंता व्यक्त होत असूनही अनेक मुंबईकर मास्कशिवाय फिरतात.
- त्यामुळे मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे, “अधिक जोखीम, कमी खबरदारी. गंभीरतेने घ्या मुंबई, धोका आहे. गेल्या आठवड्यात विनामास्क फिरत असलेल्या लोकांची वाढती संख्या पहा.”
मुंबईकरांनो, हे आकडे धक्कादायक आहेत!
या ‘आलेखा’ ची दिशा आपणच बदलू शकता. कृपया मास्कचा वापर करा. आपल्याला शिक्षा व दंड करताना आम्हालाही आनंद होत नाही.#MaskUpMumbai pic.twitter.com/WDQBMotzyb
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 30, 2021
मास्क घाला, इतरांचाही विचार करण्याचे अनुष्काचे आवाहन
- मुंबई पोलिसांचे ग्राफिक्स शेअर करत अनुष्का शर्माने लिहिले की, “मास्क घाला, इतरांचाही विचार करा.”
- यासोबतच अनुष्काने हात जोडणारे इमोजीही ठेवले होते. अनुष्का व्यतिरिक्त, अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि करिश्मा कपूर सारख्या स्टार्सनी देखील मुंबईत कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करणारे पोस्ट शेअर केले आहेत.
कोरोनाची चिंता संपलेली नाही…
- देशातील विविध राज्यांतून कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याची माहिती येत आहे.
- त्याचबरोबर, मुंबई महानगर प्रदेशात, कोरोनाच्या प्रकरणांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जिथे आतापर्यंत दररोज २५० प्रकरणे आली आहेत.
- बुधवारी नव्या रुग्णांची संख्या चारशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
- ऑगस्टच्या मध्याच्या शेवटच्या ५ दिवसात ३५० प्रकरणे समोर आली आहेत.
- १ ऑगस्ट रोजी मुंबईत ३२५ कोरोना रुग्ण आढळले, जे १५ ऑगस्ट रोजी कमी होऊन २६२ झाले होते, आता चारशेवर गेले आहेत.