मुक्तपीठ टीम
अफगाणिस्तानावर तालिबाननं कब्जा केल्यानंतर २० वर्षांनी मंगळवारी अमेरिकेचं सैन्य माघारी परतलं आहे. दोन दशके साथ देणाऱ्या अफगाणी नागरिकांना तालिबान्यांच्या तावडीत सोडून गेल्याबद्दल अमेरिकेवर अपवाद वगळता तेवढीशी टीका झालेली नाही. मात्र आता काबूल विमानतळावर सोडलेल्या कुत्र्यांसाठी अमेरिकेला जबाबदार ठरवत टीका होत आहे. अमेरिकेने काबुल विमानतळावर आपली कुत्री सोडून अफगाणिस्तानून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हणजे तत्परतेने या आरोपांची दखल घेत खुलासा केला आहे.
काबुल, कुत्री आणि अमेरिका!
• हेलिकॉप्टरसमोर पिंजऱ्यातील कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
• हे फोटो पाहिल्यानंतर अमेरिकेवर सोशल मीडियावर टीका होत आहे.
• सोशल मीडियावर याची तुलना देखील केली जात आहे की एकीकडे भारत आहे, ज्याने तेथून आपल्या कुत्र्यांची सुटका केली आणि दुसरीकडे अमेरिकेला तसे न केल्याबद्दल कमी लेखलं जात आहे.
कुत्र्यांना एकाकी सोडल्याच्या आरोपाबद्दल तत्परतेनं दखल
• पेंटागॉनने दावा केला की, ते कुत्रे अमेरिकन लष्कराचे नव्हते.
• ते कुत्रे काबुल स्मॉल अॅनिमल रेस्क्यूच्या ताब्यात आहेत.
• किर्बीने ट्वीट करत सांगितले की,’चुकीच्या अहवालात सुधारणा करण्यासाठी, हे सांगणे आवश्यक आहे की अमेरिकन सैन्याने हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पिंजऱ्यात कुत्रे मागे सोडले नाहीत.
• माध्यामांवर असलेले हे फोटो आमचे नसून काबुल स्मॉल अॅनिमल रेस्क्यूच्या देखरेखीखाली असलेल्या कुत्र्यांचे आहेत.
काबुल स्मॉल अॅनिमल रेस्क्यू कोणती संघटना?
• काबुल स्मॉल अॅनिमल रेस्क्यू ही प्राणी हक्क संघटना आहे, जी गेल्या एक वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहे.
• सुरुवातीला काही प्राण्यांना बाहेर काढण्याची योजना होती, परंतु विमानतळावर त्यांचे पिंजरे सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले.
• कारण लष्करी विमानांवर कुत्र्यांना परवानगी नव्हती आणि खाजगी चार्टर विमानांना काबुलमध्ये प्रवेश नव्हता.