मुक्तपीठ टीम
रविवारी ईडीने शिवसेना नेते अनिल परब यांना ३१ ऑगस्टला कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली असताना आता शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांच्या ओरापांनंतर ईडीने कारवाई केली आहे. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत.
किरीट सोमय्यांचे आरोप
- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
- खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करत आहे, असेही सोमय्या म्हणालेत.
- भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे.
खासदार भावना गवळी का अडचणीत?
- श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे.
- या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचं अनुदान दिलं.
- मात्र, ४३ कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही.
- उलट ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला.
- याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
खासदार भावना गवळी…आक्रमक…बेधडक…दांडगा जनसंपर्क!
- भावना गवळी या माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत.
- भावना गवळी यांनी शिवसेनेच्या खासदार म्हणून वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता.
- २०१९ मध्ये त्या सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून आल्या आहेत.
- यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवाला.
- दांडगा जनसंपर्क आणि आक्रमकता या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात.
- गेल्या २० ते २२ वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.