मुक्तपीठ टीम
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कर्मचारी राज्य विमा महामंडळात उपसंचालक या पदावर एकूण १५१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २ सप्टेंबर २०२१पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पदवीधर २) ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून २५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.