मुक्तपीठ टीम
टीव्हीच्या छोट्या पडद्यावरील मोठं नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक आदित्य नारायणचं. तो इंडियन आयडॉल या संगीताच्या रिअॅलिटी शोचा होस्ट आहे. आता मात्र तो एवढा मोठा रोल सोडत आहे. त्याने ध्येय ठेवलंय ते आपल्या भारतासाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचे. त्यासाठीच तो भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळवून देणाऱ्या होस्टच्या भूमिकेला सोडत आहे. आता तो सुखाचं होस्टचं काम सोडून ओटीटी कंटेट क्रिएशनचा संघर्ष कऱणार आहे. भारतातासाठी संगीताचा जागतिक पातळीवरचा ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचं बालपणीचं स्वप्न साकारण्यासाठी आदित्याला मुक्तपीठच्या शुभेच्छा
आदित्यची छोट्या पडद्यावरी मोठी कामगिरी
- २०१५ पासून तो नॉन-स्टॉप होस्ट करत आहे.
- २०१५ पासून त्याने सारेगामापाचे ४ सीझन अर्थात १७० भाग होस्ट केले आहेत.
- इंडियन आयडॉल २ सीझन १२० एपिसोड, १ सीझन खतरा खतरा असे एकूण ११० एपिसोड होस्ट केले.
- हे एकूण ४०० भाग आहेत.
- त्याने होस्ट केलेले इतर शो म्हणजे खतरों के खिलाडी, राइजिंग स्टार, एंटरटेनमेंट की रात, किचन चॅम्पियन, झी कॉमेडी शो.
आदित्य आता होस्टगिरी का सोडतोय?
- होस्टची भूमिका सोडून पुन्हा नवा संघर्ष सुरु करताना त्याने भूमिका मांडली आहे.
- आयुष्यात खूप मोठे काहीतरी करण्याची वेळ आली आहे.
- आता मला म्युझिक अल्बमकसह ओटीटी आणि टीव्हीसाठी कन्टेंट तयार करायचा आहे.
- त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
- तो म्हणतो, माझ्या मनाला खात्री आहे की मला हेच करायचे आहे. भारतासाठी ग्रॅमी जिंकण्याच्या माझ्या बालपणीच्या स्वप्नावर काम करण्याची वेळ आली आहे.
- यासाठी अधिक मेहनत करण्याची मला गरज आहे.”
आदित्य नारायणचा सूरमयी प्रवास
- आदित्य नारायण चित्रपट अभिनेता, संगीतकार आणि गायक तसेच टीव्ही होस्टही आहे.
- बॉलिवूड गायक उदित नारायण आणि दीपा नारायण यांचा तो सुपुत्र आहे.
- १९९५ मध्ये “रंगीला” चित्रपटातून आपल्या गायनाची सुरुवात केली.
- रंगीला चित्रपटातील त्याचे गाणे गाजले होते.
- त्यानंतर त्याने १९९५ मध्ये त्याच्या वडिलांसोबत “अकेले हम और अकेले तुम” मधील गाणे लोकांच्या मनाला भिडणारे ठरले.
- यानंतर वडिलांसोबत “अकेले हम और अकेले तुम” मध्ये काम केले. या चित्रपटातील संगीत दिग्दर्शक अनु मलिक होते.
- त्याचा अभिनय प्रवास १९९५ मध्ये सुरू झाला. मग तो बालकलाकार होता आणि निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्याला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यान पाहिले होते.
- यानंतर सुभाष यांनी त्यांच्या आगामी “परदेश” चित्रपटासाठी त्याची निवड केली.
- यानंतर त्याने “जब प्यार किसी से होता है” चित्रपटातही काम केले. या चित्रपटासाठी १९९९ मध्ये झी सिने पुरस्कारांमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते.
प्रमुख चित्रपट
- २०१३ मध्ये गोलियो की रासलीला रामलीला या चित्रपटात पार्श्वगायक
- २०१० मध्ये शापित चित्रपटात अभिनेता, संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक
- २००९ मध्ये चल चले चित्रपटात पार्श्वगायक