मुक्तपीठ टीम
देशात विकसित केलेल्या स्मार्ट अँन्टी एअरफिल्ड वेपनची, हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेडच्या हॉक-I या लढाऊ विमानामधून यशस्वी चाचणी घेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नवे शिखर साध्य केले आहे. ओडिसाच्या किनाऱ्यावर २१ जानेवारी २०२० ला ही चाचणी घेण्यात आली.
भारतीय हॉक- एमके १३२ मधून हे वेपन डागण्यात आले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने या वेपनची नवव्यांदा यशस्वी चाचणी केली आहे. निर्धारित सर्व लक्ष्य या वेपनने साध्य केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन केंद्र इमारत-आरसीआय, हैदराबाद ने हे वेपन विकसित केले आहे. १२५ केजी वर्गातले हे स्मार्ट वेपन, १०० किमी परिसरात, शत्रूच्या रडार, बंकर, रनवेवर मारा करू शकते. याआधी या वेपनची जॅग्वार विमानातून चाचणी करण्यात आली होती.
या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी या टीमचे अभिनंदन केले आहे.