मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बसपा प्रमुख मायावती यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचा वासदार हा अनुसूचित जातीतीलच असेल, असेही घोषीत केले आहे. एवढेच नव्हे तर मायावतींनी त्यांच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.
मायावतींचा वारसदार!
त्यांनी सांगितले की, त्यांच्या वारसदाराबद्दल सध्या अंदाज लावण्याची गरज नाही. कारण आता मी फिट आहे. जेव्हा मी पक्षाचे नेतृत्व करू शकणार नाही, तेव्हा मी स्वतः त्याची घोषणा करेन. माझा वारसदार हा अनुसूचित जातीतलाच असेल, ज्याला मी आणि पक्षाने प्रामाणिकपणे घडवलेले असेल. आतापर्यंत पक्षाने अनेक चढउतार पाहिले आहेत. काशी राम यांनी आजारी असताना आपल्या वारसदाराची घोषणा केली असे मायावतींनी सांगितले.
मायावतींचा काँग्रेसवरही जोरदार हल्ला
- मायावतींनी सांगितले की, काँग्रेस जमाव जमा करण्यासाठी पैसे आणि अन्नाचे आमिष दाखवत आहे.
- अलीकडेच काँग्रेस पक्षाने २४ पानांची पुस्तिका तयार केली आहे.
- ही पुस्तिका कार्यकर्त्यांमध्ये वाटली जाईल.
- आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या पुस्तिकेत उल्लेख आहे की, बसपासह इतर पक्षांनी राज्यात काँग्रेसविरोधात गैरसमज निर्माण केले आहेत.
- यावर प्रतिक्रिया देताना बसपा सुप्रीमो मायावतींनी सांगितले की, लोकांना अन्न आणि पैशाचे आमिष दाखवून काँग्रेसने त्यांना त्यांच्या सभांमध्ये आणले, ही काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे.
- काँग्रेस पक्षाने आता आपला जनाधार गमावला आहे, असे यातून दिसून येते.
- आता गरज आहे ती काँग्रेस पक्षाने या पुस्तिकांमध्ये आपल्या उणीवा अधोरेखित केल्या पाहिजेत आणि सर्व विरोधी पक्षांना दोष देण्याऐवजी त्यांनी त्यांचे स्वत: कडे लक्ष दिले पाहिजे.
- मायावतींनी आरोप केला की, उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला तिकिट देण्यासाठी लोकांना शोधावे लागत आहे.
काँग्रेसकडून उद्योगपतींची मदत
- ते उद्योगपतींची मदत घेत आहे जेणेकरून ते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निधी देऊ शकतील.
- काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी अस्वस्थ आहे.
- पण काँग्रेस पक्षाची चुकीची धोरणे, कार्यसंस्कृती आणि दुटप्पीपणा हे आज सत्ता जाण्याचे सर्वात मोठे कारण आहे.
- काँग्रेस लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहे पण आज लोकांना काँग्रेसच्या युक्त्या समजल्या आहेत.
- ते अशा अनेक पुस्तिका जारी करू शकतात परंतु ते त्यांना मदत करणार नाही.