मुक्तपीठ टीम
एक काळ होता जेव्हा सुफी संस्कृतीचा पगडा असलेल्या काश्मीरात खुलं वातावरण होतं. पुढे पाकिस्तानी पाठिंब्यानं इस्लामी कट्टरतावाद बोकाळला आणि सारंच चित्र बदललं. आता केंद्रशासित प्रदेश असलेल्या काश्मीरातील चित्र पुन्हा बदलताना दिसतेय. तिथं नुकताच झालेलं एक लग्न चांगलंच गाजतंय. कारण वधू गाडी ड्राइव्ह करत आपल्या सासरी पोहचली. तिथं तिचं थाटात स्वागत झालं.
काश्मीरमध्ये लग्नानंतर कार चालवून जेव्हा वधू तिच्या सासरच्या घरी पोहोचणं नवलाचंच मानलं गेलं. सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. ती ड्रायव्हिंग सीटवर, तिच्या हाती स्टिअरिंग आणि शेजारच्या सीटवर तिचा नवरा. त्यांची छायाचित्रं आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काश्मीरप्रमाणेच देशभरातून त्यांचे खूप कौतुक होत आहे.
काश्मीरचं बदलतं मन दाखवणारं लग्न
- हा विवाह बारामुल्ला जिल्ह्यातील डेलिना येथे झाला.
- ही कथा आहे सना वानी आणि आमिर शेखची.
- सनाचे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील डेलीना येथे आमिर शेखसोबत लग्न झाले.
- पाठवणीच्या वेळची रडारड, भावनांचे धबधबे कोसळणे तसं नेहमीचंच.
- पण सना-आमिरच्या लग्नात सारं वेगळंच होतं.
- लग्नात काही तरी वेगळं करायचं म्हणून आमिरने सनाला कार ड्राइव्ह करण्याचे सुचवले. तिनेही तत्परतेने कल्पना उचलून धरली.
- सासरी जाताना सनाने कोणताही संकोच न करता कारचे स्टीयरिंग घेतले आणि नवदांपत्य सासरच्या घरी पोहोचले.
सोशल मीडियावर व्हायरल लग्न
- काश्मिरातील गेल्या काही वर्षांच्या दहशतग्रस्त रुढीग्रस्त वातावरणात हे लग्न एक दिलाशाची झुळूक आहे.
- त्यामुळेच सोशल मीडियावर लग्न जोरदार व्हायरल होत आहेत.
- लोक या चित्रांचे कौतुक करताना दिसत आहेत.
सनाला सासू-सासऱ्यांचा पाठिंबा
- आपल्या सासू-सासऱ्यांविषयी सना कृतज्ञता व्यक्त करते.
- पती आमिरने तिला विचारले की ती कार चालवू शकतो का? सनाने ऑफर स्वीकारली.
- सना कार चालवत सासरच्या घरी पोहोचले. मला कार चालवताना पाहून माझे सासरे आणि सासू खूप खूश झाले.
- यासोबतच त्यांनी महिलांना त्यांच्या हक्कांसाठी उभे राहण्यास सांगितले.
काय म्हणाले पती अमीर?
- आमिरला सनासाठी हा प्रसंग खास बनवण्यासाठी चांगलं करायचं होतं.
- तसंच काश्मिरी लग्नांच्या पारंपरिक त्याच त्या रूढी मोडण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं.
- काश्मिरात नेहमी वराच्या बाजूने कोणीतरी असतो, जो गाडी चालवतो. महिलांनाही समान अधिकार आहेत, हे दाखवलं पाहिजे.
- सनाला कार चालवताना पाहून कुटुंबातील सर्वच खूश झाले.