मुक्तपीठ टीम
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याच्या सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर २५ मेगावॅटचा सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प उभारला आहे. २०१८ मध्ये केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या फ्लेक्सिबिलायझेशन योजनेअंतर्गत उभारला जाणारा हा पहिला सौर प्रकल्प आहे.
या सोलर पीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन आज एनटीपीसीचे RED (WR2 & SR) संजय मदन यांनी केले.
सौर ऊर्जेचा तरंगता प्रकल्प
- या फ्लोटिंग सोलर इंस्टॉलेशनची विशिष्ट रचना असून ते RW जलाशयात ७५ एकरवर पसरलेले आहे.
- या फ्लोटिंग सौर प्रकल्पात १ लाखांहून अधिक सौर पीव्ही मॉड्यूलमधून वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.
- यामुळे ७००० कुटुंबांना वीज पुरवण्यात मदत होणार आहे.
- या प्रकल्पामुळे दरवर्षी किमान ४६,००० टन इतके कार्बन डायॉक्साईड (CO2e ) उत्सर्जन टाळता येईल.
समुद्राच्या पाण्यावर चालणारा सिंहाद्री औष्णिक वीज प्रकल्प
- बंगालच्या उपसागरातून पाईपद्वारे पाणी घेऊन २००० मेगावॅट वीजनिर्मिती करणारा कोळसा आधारित सिंहाद्री स्टेशन हा पहिला औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे.
- तो २० वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे.
- याशिवाय एनटीपीसी सिंहाद्री येथे प्रायोगिक तत्वावर हायड्रोजन-आधारित मायक्रो-ग्रिड यंत्रणा उभारण्याची योजना आखत आहे.
एनटीपीसीची महाक्षमता
- ६६,९०० मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेसह,एनटीपीसीकडे २९ नवीकरणीय प्रकल्पांसह ७१ वीज केंद्रे आहेत.
- एनटीपीसीने २०३२ पर्यंत ६० गीगावॅट (जीडब्ल्यू) नवीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- ५ गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसह या महामंडळाची १७ गीगावॅटपेक्षा जास्त निर्माणाधीन क्षमता आहे.