मुक्तपीठ टीम
अॅप्पल आता येत्या महिन्यात आपली पुढची आयफोन १३ सिरीज बाजारात आणण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्सचा समावेश असेल. अनेक अहवालांमध्ये असे सांगितले जात आहे की, हे शेवटचे वर्ष असेल जेव्हा कमी मागणीमुळे मिनी व्हर्जन पाहायला मिळेल.
अधिक माहितीसाठी मुक्तपीठ डॉट कॉमवरील चांगल्या बातम्यांची कॅटेगरी तपासा.
अॅप्पलने आपला नवीन आयफोन १३ मिनी लाँच करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही आहे. तरी, ते पुढील महिन्यात लॉन्च केले जातील अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आयफोन १३ मिनीसह पुढील व्हर्जनचेही आयफोन लॉन्च करेल.
अॅप्पल आयफोन १३ मिनीचे जबरदस्त फिचर्स
- आयफोन १३ मिनीचे डिझाईन कॅमेरा प्लेसमेंट आणि लहान नॉचशिवाय इतर फिचर्स हे आयफोन १२ मिनीप्रमाणेच आहेत.
- कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह एक नवीन कनेक्टर पिन देखील सादर करू शकते.
- आयफोन १३ मिनीमध्ये ५.४ इंचाचा एलटीपीओ डिस्प्ले ६० एचझेडच्या रिफ्रेश रेटसह अपेक्षित आहे.
- असे म्हटले जात आहे की डिव्हाइस कमी आकाराचे असेल आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील असेल.
- यामध्ये नवीन ए१५ बायोनिक चिपसेटची क्षमता असेल, जे ४एनएम प्रक्रियेवर आधारित असण्याची अपेक्षा आहे.
- यात २,२२७ एमएएच बॅटरीऐवजी २,४०६ एमएएच बॅटरी येऊ शकते.
- आयफोन १३ च्या सर्व मॉडेल्सला अपग्रेड केलेले अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळतील आणि त्यात लिडर सेन्सर असतील.
आयफोन १३ मिनीची किंमत अंदाजे ५१,९७२ रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अॅप्पल या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच तारखेचे अनुसरण करेल. या डिव्हाइसची विक्री सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सुरू होईल. कंपनी १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान हा आयफोन लाँच होण्याची शक्यता आहे.