मुक्तपीठ टीम
कुर्ल्यातील गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. शासनाच्या वतीने नायब तहसीलदार महेश मिसाळ यांनी उपस्थित राहत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यात ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत युवा मंडळी शामिल झाल्या होत्या.
ज्येष्ठ नागरिक दिमा (अण्णा) प्रभुदेसाई, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, भास्कर सावंत, विश्वास कांबळे, उमेश गायकवाड, संजय घोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठिय्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. यात गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला हस्तांतरित करणे, सुरक्षा भिंत उभारणे, मैदानातील मोडकळीस आलेला स्टेज निष्कासित करणे, मैदानात क्यूआरकोड स्कॅनिंग मशीन व सीसीटीव्ही बसविणे आणि पालिकेने मैदान विकसित करणे या मुद्यावर जोर देण्यात आला. नायब तहसीलदार महेश मिसाळ यांनी निवेदनाचा स्वीकार करत तात्काळ कारवाईची ग्वाही दिली. खासदार पूनम महाजन, आमदार संजय पोतनीस यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
यावेळी दिलीप सराटे, मंगला नायकवडी, प्रकाश चौधरी, संजय घोणे, कैलास पाटील, राकेश गागनवाड, संतोष पांढरे, अमित कांबळे, आनंद शिंदे, राजेंद्र शितोळे, मोहन घोलप, राहुल जानकर, अरविंद दाभाडे, अरुण गायकवाड, विनोद साडविलकर, निलाधर सकपाळ, डिंपल छेडा, संगीता बाबर, सुनील मतकर, समाधान पिंगळे, शैलेश पाटील, राजेश भोजने, सागर देवरे, राजा साळवे, नरपत राजपुरोहित, शशिकांत सांमत, गणेश चिकणे, मीरा वेताळ, संजय गांगुर्डे, विकास कांबळे, संतोष देवरे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.