Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हीरक महोत्सव व्याख्यानमालेद्वारे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न”

सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे गौरवोद्गार

August 16, 2021
in सरकारी बातम्या
0
Dilip pandharpatte

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज्याच्या विविध क्षेत्रांचा इतिहास जागवत, उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न महाराष्ट्र परिचय केंद्राकडून झाल्याचे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी काढले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप डॉ. पांढरपट्टे यांच्या भाषणाने झाला. या व्याख्यानमालेचे अंतिम ६१वे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

 

यावर्षी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६१ वर्ष पूर्ण झाली तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रालाही ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन्ही घटनांचे औचित्यसाधून दिल्लीतील महाराष्ट्राचे दूतावास असणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा अभिनव उपक्रम राबवून एकूण ६१ व्याख्याने आयोजित केली. राज्याचे समाजकारण, राजकारण, तर्कवाद अशा विविध विषयांना या व्याख्यानमालेच्या माध्यमातून उजाळा देण्याचे कार्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ज्येष्ठ संपादक गिरीष कुबेर, खासदार कुमार केतकर, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.शरण कुमार लिंबाळे,डॉ.विजया वाड,राजू परुळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साहित्य,संस्कृती,कला, शिक्षण, अशा विविध विषयांवर आपले विचार मांडले. या व्याख्यानमालेद्वारे राज्यातील विविध क्षेत्रांच्या इतिहासाला उजाळा देवून भविष्याचा वेध घेणारी महत्वपूर्ण मांडणी करण्यात आली व ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

महाराष्ट्राला संतांची मोठी पंरपरा आहे. संतांनी भक्तीमार्गासह राज्याच्या पुरोगामी वाटचालीचे बीज रोवले. परिणामी, संतांपासूनच महाराष्ट्राच्या प्रागतिक वाटचालीला सुरुवात झाली. महाराष्ट्राने निर्मितीपासूनच पुरोगामित्वाची कास धरली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रागतिक, पुरोगामी व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण दिला. हा वारसा आपण पुढे नेत आहोत. राज्य काही बाबतीत पुढारलेले असले तरी काही बाबतीत आपल्याला बराच पल्ला गाठायचा असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

 

सामाजिक अभिसरणाच्या चळवळीची दीर्घ पंरपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. सामाजिक अभिसरणातून महाराष्ट्रात झालेल्या विविध वैचारिक चळवळीचे सार मांडतांना कवीश्रेष्ठ सुरेश भटांचा शेर

“जगाची झोकुनी दु:खे ,स्वत:शी भांडतो आम्ही!

स्वत:च्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही!!”

त्यांनी उद्धृत केला. राज्याच्या सामाजिक अभिसरणात सहभागी मंडळींनी जगातील सर्व दु:खे आपल्याकडे घेतली व प्रसंगी प्राणाची आहूती दिली. या थोर मंडळींचा आत्मविश्वास व्यक्त करणारा,“कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला, तिथे नांदतो विठू जिथे झेंडा रोवतो आम्ही. ” हा शेरही त्यांनी यावेळी सादर केला.

 

राज्यात झालेल्या वैचारिक क्रांतीमुळेच या मातीतील लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. म्हणूनच राज्याने कोरोना महामारी,चक्रीवादळ, पूर परिस्थिती यांसारख्या संकटांना न डगमगता नेटाने सामना केला व परिस्थिती आटोक्यात आणली. संकटांचा सामना करण्याच्या महाराष्ट्रातील जनतेच्या धाडसा विषयी भावना व्यक्त कराताना “शौक से आये बुरा वक्त अगर आता है, हमको हर हाल में जीनेका हुनर आता है.” हा शेर उदृधृत केला.

 

महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी व निर्मितीनंतरही सामाजिक अभिसरणाचे प्रयोग झाले. यात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, गोपाळ गणेश आगरकर असे अनेक महापुरूष आहेत व त्यांच्या विचारांचा मोठा वारसा राज्याला मिळाला. अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार व त्यातून उभे राहिलेले राज्यातील कार्य उल्लेखनीय आहे. राज्यात समाजातील सर्व स्तरांतील जनतेला न्याय देण्याचे काम झाले आहे. समाजातील घटक वंचित राहू नये याची खबरदारीही महाराष्ट्राने घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांची मोठी फळी राज्यात निर्माण झाल्याचे सांगत कृषी, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी प्रगती केली आहे व देशाला नेतृत्व दिल्याचे त्यांनी नमूद केले.

 

राज्याच्या नाटक, संगीत,साहित्याच्या उज्ज्वल पंरपरेवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. नाटक हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्ये असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठीत दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होत आलेले आहे. प्रायोगि‍क व व्यावसायिक रंगभूमीने मराठी नाटकांमध्ये नवीनता आल्याचेही त्यांनी नमूद केले. नाटकांप्रमाणेच मराठी साहित्यालाही मोठी पंरंपरा आहे. दया पवार यांच्या ‘बलूतं’ या आत्मकथनाने मराठी साहित्यात क्रांती घडवली. थोर लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्याला वेगळी दिशा दिली. मराठी साहित्यात नाविन्यपूर्ण प्रयोग सुरु असून हे आश्वासक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मराठी चित्रपटक्षेत्राने मोठी झेप घेतली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये मराठी चित्रपट अग्रस्थानी असतात. मराठी चित्रपटांचा तांत्रिकदर्जा व गुणवत्ता वाढत आहे व ही परंपरा भविष्यात विस्तारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांची झालेली प्रगती भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, प्र.के.अत्रे यांसारख्या थोर पत्रकारांची परंपरा राज्याला लाभली आहे. बहुतांश राजकीय नेते हे पत्रकारही होते असा उल्लेखही त्यांनी केला. राज्यातील पत्रकारितेला कृतीशील विचारवंतांची परंपरा आहे. आजही मराठी पत्रकारितेचे जनमानसात आदराचे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र हे विविध क्षेत्रात प्रयोग करणारे व ते प्रयोग यशस्वी करणारे राज्य आहे. विविध क्षेत्रात कार्यरत राज्यातील जनतेनेही स्वत:च्या प्रगतीबद्दल संतुष्ट न राहता, आप-आपल्या क्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करण्याचा शोध व वेध घेत रहावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

“उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही.” अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाची महती वर्णन केली. “धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा माझा विचार नाही.” या ओळींद्वारे महाराष्ट्र कोणत्याही संकटाला न डगमगता विविध क्षेत्रात आपले ध्येय प्राप्त करेल, असा विश्वास डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी व्यक्त केला.


Tags: Dr.Dilip pandharpatteMaharashtraडॉ. दिलीप पांढरपट्टेमराठी चित्रपटमहाराष्ट्र
Previous Post

“शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

“अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय?”

Next Post
Pm Modi

"अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!