मुक्तपीठ टीम
अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर,अमरावती आणि नासिक शहरातील सुमारे साडे पाच लाख जागांसाठी ही आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामिण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.
पहिल्या फेरीची सुरूवात आज पासून होणार असून २२आॅगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ आॅगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरतां येणार आहे. दि.२३ ते २५ आॅगस्ट दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते३० आॅगस्ट दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि.३१ आॅगस्ट ला , तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि.१२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना
https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.