मुक्तपीठ टीम
संसदेच्या अधिवेशना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करून देऊ शकले नाहीत. विरोधकांच्या गदारोळामुळे जे शक्य झाले नाही ते आता जनाशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून करण्याचे भाजपाने ठरवले आहे. मात्र, केवळ परिचय एवढाच उद्देश नसून त्या माध्यमातून ज्या समाज घटकांमधून ते मंत्री आहेत त्या समाजघटकांना मोदी सरकारमध्ये तुमचंही कुणीतरी आहे, असा संदेश देण्याची रणनीती आहे.
जनसंपर्क, परिचय आणि जनाशीर्वाद!
- सर्व मंत्री मिळून ३ दिवसात १४२ दिवसांचा प्रवास करतील.
- यात्रेच्या दरम्यान हे मंत्री १६६३ बैठकाही घेणार आहेत.
- भाजपच्या राजकीय प्रगतीमध्ये अशा यात्रांचे खूप महत्त्व राहिले आहे.
- यात्रांद्वारे त्यांनी देशभरात आपली वेगळी ओळखही प्रस्थापित केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता.
- अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली जाते, परंतु विरोधकांनी गोंधळ निर्माण करून हे होऊ दिले नाही.
- त्यानंतर भाजपने प्रचाराची रचना केली.
- यामध्ये नवीन मंत्र्यांना जनतेसमोर आणण्याचा आणि जनतेला थेट परिचय देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जनाशीर्वाद यात्रा…३ दिवसात १९ हजार ५६७ किमीचा टप्पा!
- पक्षाचे महासचिव तरुण चुग यांनी या जन आशीर्वाद यात्रेची ब्लू प्रिंट तयार केली आहे.
- भाजपचे ३९ नवे मंत्री तीन दिवसांचा प्रवास करतील आणि एकूण २१२ लोकसभा मतदारसंघ आणि १९५६७ किमी अंतर कापतील.
- राज्यमंत्री १६, १७ आणि १८ ऑगस्टला आणि केंद्रीय मंत्री १९, २० आणि २१ ऑगस्टला प्रवास करतील. • ही यात्रा १९ राज्ये आणि २६५ जिल्हे व्यापणार आहे.
- यात १६६३ बैठका होतील. काही राज्यांमध्ये या बैठका ५ ते ७ दिवस चालतील.
जनाशीर्वाद यात्रेमागील रणनीती
- या भेटींद्वारे सरकारची दोन वर्षांची कामगिरी, विशेषतः कोराना काळात केलेली काम लोकांपर्यंत पोहचवली जातील.
- यासोबतच लसीकरणाबाबत जनजागृतीही केली जाईल.
- ही यात्रा पंतप्रधानांच्या 15 ऑगस्टच्या भाषणावेळी, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या सुरुवातीला होणार असल्याने, तो संदेशही दिला जाईल.
- यावेळी भाजपने यात्रेचे स्वरूप अशा प्रकारे ठरवले आहे की जास्तीत जास्त मंत्री कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतील.
- त्यासोबतच जास्तीत जास्त भौगोलिक क्षेत्र कव्हर करता येइल असे नियोजन करण्यात आले आहे.
- मोदी मंत्रिमंडळात नव्याने सामील करण्यात आलेले मंत्री हे वेगवेगळ्या समाजघटकांमधील आहेत.
- या नव्या मंत्र्यांना लोकांसमोर पाठवल्यानंतर त्या त्या समाज घटकांना मोदी सरकारमध्ये आपलं कुणीतरी आहे, हे लक्षात येईल. सरकारशी आपुलकीचे बंध तयार होतीस, अशी रणनीती आहे.
नारायण राणेंची जनाशीर्वाद यात्रा
- नारायण राणे हे १९ ऑगस्टपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत.
- १९ आणि २० ऑगस्ट असे दोन दिवस ही यात्रा मुंबईत आहे.
- त्यानंतर २१ ऑगस्टला वसई विरार
- मग २३ ऑगस्टला दक्षिण रायगड,
- २४ ऑगस्टला चिपळूणमध्ये जाणार आहे.
- २५ ऑगस्ट रत्नागिरी
- २६ ऑगस्टला सिंधुदुर्ग येत, नारायण राणेंच्या या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे.