मुक्तपीठ टीम
पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने शरीरसंबंध ठेवणे वैवाहिक जीवनात बेकायदेशीर नसल्याचे सांगत मुंबई सत्र न्यायालयाने एका पतीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामंध्ये केरळ उच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात असे म्हटले आहे की, वैवाहिक बलात्कार क्रूरता आहे आणि ते घटस्फोटाचे कारण असू शकते. या प्रकरणातील पीडित महिलेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत.
पत्नीची पतीविरोधात काय तक्रार?
- पीडित महिलेने सत्र न्यायालयाला सांगितले की, पतीने जबरदस्ती शरीरसंबंध ठेवल्यामुळे तिला कंबरेपर्यंत अर्धांगवायू झाला.
- यासोबतच पीडितेने पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला होता.
- त्याचवेळी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी हा खोटा खटला असल्याचे सांगत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता जो न्यायालयाने मंजूर केला.
या प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एसजे घरत म्हणाले की, महिलेचे आरोप कायदेशीर छाननीखाली येत नाहीत. तसेच असे म्हटले आहे की जर पतीचा पत्नीशी संबंध ठेवत असेल तर त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. त्याने कोणतेही अनैतिक कृत्य केलेले नाही.
न्यायालयाने सांगितले, महिलेला अर्धांगवायू होणे दुर्दैवी!
- न्यायाधीशाने सांगितले की, महिलेला अर्धांगवायू झाला हे फारच दुर्देवी आहे.
- पण तरीही संपूर्ण कुटुंबाला यासाठी जबाबदार धरता येऊ शकत नाही.
- वैवाहिक बलात्कार हा भारतात गुन्हा नाही.
- या प्रकरणात पोलीस कोठडीत चौकशीची गरज नाही.
- महिलेने हुंडा छळ केल्याचा आरोप केला.
- परंतु हुंड्यात काय मागितले हे सांगितले नाही.
पत्नीचा पतीवरच आरोप, जबरदस्तीमुळे अर्धांगवायू!
- लग्नाच्या एक महिन्यानंतर जबरदस्तीने संबंध ठेवत होता पती
- या महिलेचे नोव्हेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते.
- लग्नानंतर एक महिन्यानंतर पतीने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.
- या दरम्यान, जेव्हा जानेवारीत तिची तब्येत बिघडली तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली.
- तिला कंबरेच्या खालच्या भागात लकवा मारल्याचे समजले.