मुक्तपीठ टीम
हिमालयातील सियाचेनमधील चमू तेहराम शेर हिमशिखरांमध्ये पाच अस्पर्शित शिखरे आहेत. ही हिमशिखरे लष्करातील गिर्यारोहक एकाच वेळी सर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी निघालेल्या मोहिमेला क्रांतीदिनी रोजी चीफ ऑफ स्टाफ, फायर अँड फ्युरी कोअर मेजर जनरल आकाश कौशिक यांनी सियाचेन बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
भारतीय लष्करातील लडाख स्काऊटमधील गिर्यारोहक एकाच वेळी APSARASAS I, APSARASAS II, APSARASAS III, PT-6940 आणि PT-7140 ही शिखरे सर करण्याचा प्रयत्न करतील. बेस कॅम्पवर आयोजित सोहळ्याला सियाचेन बेस कॅम्पवर तैनात तुकड्या तसेच भारतीय लष्करात सेवा बजावलेल्या दिग्गज स्थानिकांची उपस्थिती होती.
सियाचेन जगातील सर्वात उंच रणभूमी
- सियाचेन हे जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्र आहे.
- सियाचेनमध्ये हिवाळ्यात तापमान उणे ६० अंशांपेक्षा खाली येते
- अशा विपरीत हवामानात तेथे तैनात सैनिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
- सियाचेनमधील तापमान सामान्य दिवसांमध्ये उणे ४५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते.
- हिवाळ्यात ते उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते.
- सियाचेनमध्ये तैनात सैनिकांना शत्रूबरोबरच हवामान आणि ऑक्सिजनच्या अभावाचा सामना करावा लागतो.
गिर्योरोहण मोहिमेमुळे सियाचेनमधील सुविधा संशोधनासाठी लाभ
- कधीकधी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे सैनिकांची स्मरणशक्ती कमजोर होण्याची शक्यता असते. ऑक्सिजनच्या अभावामुळे जवानांना भाषण, फुफ्फुसांचे संक्रमण आणि अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
- भारतीय सैनिक अशा कठीण परिस्थितीतही शत्रूवर बारीक नजर ठेवतात आणि आपला देश सुरक्षित ठेवतात.
- भारतीय सेनादलाच्या गिर्यारोहकांच्या मोहिमेळे अस्पर्श शिखरांवरील परिस्थितीच्या परिणामांचा अभ्यास करता येईल.
- सियाचेनमधील अतिशय प्रतिकूल स्थितीपेक्षाही अति प्रतिकूल परिस्थिती या पाच शिखरांवर असण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे सध्या उपलब्ध साधनांचा तेथे किती उपयोग होतो, किंवा आणखी काय साधनं, सुविधा आवश्यक असतील, यावर संशोधन करण्यासाठी या मोहिमेतील अनुभवांचा उपयोग होऊ शकेल.