मुक्तपीठ टीम
जीपीएस प्रणालीनंतर आता देशभरातल्या टोलनाक्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक नवं धोरण आणत आहे. यानुसार आता टोलनाक्यांवर जीपीएसवर आधारित ट्रॅकिंग सिस्टीम असेल. यामुळे टोलनाके बंद होऊन जीपीएस टोल सिस्टीमच्याआधारे टोल आकारला जाईल. हे तंत्रज्ञान देशातच विकसीत केलं जात आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
कशी काम करणार ट्रॅकिंग सिस्टिम?
- टोलनाक्यांची आवश्यकताच राहणार नाही.
- त्यामुळे साहजिकच कर्मचारी वर्गही लागणार नाही.
- टोल ट्रँकिंग हे रशियन तंत्रज्ञान आहे.
- या तंत्रज्ञानामुळे तुमची गाडी कोणत्या हद्दीत आहे, हे समजेल.
- त्यानुसार जीपीएस इमेजिंगचा वापर केला जाईल.
- यानंतर संबंधित वाहनचालकाच्या ई-वॉलेटमधून टोलची रक्कम कापली जाईल.
- सध्याच्या नवीन वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम असल्यामुळे या कामात अडथळे येणार नाहीत.
- तसंच जुन्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक असणार आहे.
फास्टॅग यंत्रणा कशी काम करते?
- वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात.
- याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारे वापर करते.
- ही टेक्नॉलॉजी थेट टोल नाक्यावरच्या स्कॅनरला कनेक्ट असतं.
- यातून तुमच्या अकाऊंटमधले पैसे कापले जातात.
- परिणामी, वेळ न दवडता गाडी टोलनाका क्रॉस करते.
- फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता.
- त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोलनाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कापले जातात.
रस्ते बांधणीसाठीही गडकरींचा महत्वाचा निर्णय
- रस्ते बांधणीच्या खर्चात बचत व्हावी यासाठी सिमेंट आणि स्टीलचा कमीतकमी वापर करण्याचा प्रयत्न करावा.
- देशातील सिमेंट आणि स्टील उत्पादक कंपूशाही करत आहेत. यावर काहीतरी तोडगा काढणे गरजेचे आहे.
- यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ सल्लागार नेमून सिमेंट आणि स्टीलवरील खर्चात कशी बचत होईल, यावर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.