मुक्तपीठ टीम
हिरो मोटोकॉर्प आता लवकरच इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जगात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्पने कंपनीला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक शेअर केला आहे. या स्कूटरची तुलना ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरशी केली जात आहे.
हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांनी हिरो इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला लूक सादर केला आहे. ती लवकरच लॉन्च केली जाईल. लाईव्ह स्ट्रीम दरम्यान, मुंजाल यांनी हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये जागतिक नाव बनवण्याच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच सांगितले की, कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर जगातील २० वेगवेगळ्या बाजारात सादर करेल.
हिरो मोटोकॉर्पच्या इ-स्कुटरचे अनोखे फीचर्स
- कंपनीने सादर केलेली इलेक्ट्रिक स्कूटरचा स्टायलिश आहे.
- ही स्कूटर पांढरा रंग आणि काळ्या बॅजने सजलेली दिसत आहे.
- तसेच, लॉन्चच्या वेळी या स्कूटरमध्ये काही बदल दिसू शकतात.
- कंपनी इतर अनेक रंगांमध्ये ती ऑफर करेल.
- स्कूटर विशेष रूपात डिझाईन करण्यात आली आहे. सीटवर दोन लोक सहज बसू शकतात.
- काही दिवसांपूर्वी हिरो मोटोकॉर्पने बॅटरी स्वॅप आणि तंत्रज्ञानासाठी तैवानची कंपनी गोगोरोशी हातमिळवणी केली आहे.
- असे मानले जाते की गोगोरोशीचे इन-हाऊस डिझाइन हे हिरोचे असेल आणि रिचार्जसाठी बॅटरी स्वॅपिंग सारखी वैशिष्ट्ये या स्कूटरमध्ये दिसू शकतात.
हिरो मोटोकॉर्पचीही ई-व्हेहिकल्सच्या ग्लोबल बाजारावर नजर
- हिरो मोटोकॉर्पच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला समोरच्या बाजूला १२ इंचाचे आणि मागील बाजूस १० इंचाचे ५-स्पोक अलॉय देण्यात आले आहे.
- पवन मुंजाल यांनी या स्कूटरशी संबंधित इतर माहिती अजून शेअर केलेली नाही आहे.
- ओला १५ ऑगस्टला पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे तेव्हाच हिरोने आपल्या या स्कूटरची घोषणा केली आहे.