Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षक झाले शेतकरी, शेतकऱ्यांना पाठवले लसीकरणासाठी!

August 11, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Farmers

मुक्तपीठ टीम

शर्ट…दुमडलेली पँट…सलावर कमिझ….असे चांगले स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घालून शेतातल्या चिखलात लावणीचं काम. आश्चर्यच वाटेल हे पाहून. वाचून. पण असं प्रत्यक्षात घडलं ते माणिकपूर गावात. तिथं मस्त थाटात पेरणी करणारे शेतकरी नव्हते तर ते होते शिक्षक. त्यांनी स्वत: पेरणीचे काम केले, त्यामुळे शेतकऱ्यांना लसीकरणासाठी जाणे शक्य झालं.

 

अभिमान वाटावा असे हे शिक्षक आहेत, मध्यप्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यातील माणिकपूरचे. शिक्षक शेतात भात लावणी करताना पाहायला मिळाले, कारण शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना लसीकरणासाठी वेळ काढता येत नसल्याचं त्यांना कळले. ३३ शेतकऱ्यांचा दुसरा डोस बाकी होता. लसीकरण केंद्र ओस पडलं होतं. त्यामुळे शिक्षक शेतात गेले. त्यांनी शेतकऱ्यांचे काम सुरु केलं आणि शेतकरी लसीकरणासाठी गावातील केंद्रावर गेले. असे शिक्षक आणि असे शेतकरी हेच आपले खरे भाग्यविधाते!

 

लसीकरणाविषयी लोकांमध्ये जनजागरण झाल्यानंतर आता प्रतिसाद वाढत आहे. या शेतकऱ्यांनीही पहिला डोस घेतला होता. पण त्यांना दुसऱ्या डोसच्या वेळी शेतकरी आणि मजुरांनी आरोग्य विभागाला सांगितले होते की, आम्ही काम पूर्ण केल्यानंतरच लसीसाठी जाऊ. अशा परिस्थितीत शिक्षकांनी त्यांना लसीसाठी पाठवून त्यांचे काम सुरू केले.

शिक्षक झाले शेतकरी!

  • शिक्षकांचे शेतकऱ्यांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न केले.
  • भोपाळपासून ३८० किमी अंतरावर असलेल्या शाहपूरपासून माणिकपूर गावात शिक्षकांनी ७ ऑगस्ट रोजी भात लागवड केली आहे.
  • प्राथमिक शालेय शिक्षक जी आर झारिया यांनी सांगितले की, शिक्षक लोकांच्या सामान्य लसीकरणासाठी फेरी मारत असताना गावात बांधलेल्या बांधावर पोहोचले.
  • तेथे पोहोचल्यावर त्यांनी लसीकरण केंद्र रिकामे असल्याचे पाहिले.
  • बांधावर उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदीनुसार ३३ लोकांना लसीचा दुसरा डोस बाकी होता.
  • दुपारी एक वाजेपर्यंत लसीकरण केंद्रावर कोणीही लस घेण्यासाठी आले नव्हते.
  • त्यांना आढळले की, सर्व शेतकरी भात लागवडीसाठी शेतात आहेत.
  • झारिया म्हणाले की, यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी शेतात गेलो.
  • त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.
  • शेतकरी आणि मजुरांनी सांगितले की ते लस दुसऱ्या दिवशी घेऊ शकतात, हवामानामुळे लागवड करणे महत्त्वाचे आहे.
  • त्याच वेळी, शिक्षक गावात पोहोचले आणि शेतकऱ्यांची ही वेदना समजून घेतली.
  • यानंतर शिक्षकांनी एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर शिक्षकांनी शेतात काम करायचे ठरवले आणि शेतकऱ्यांना लसीकरणासाठी पाठवले.
  • त्याच वेळी, शिक्षक स्वतः देखील लस घेण्यासाठी तेथे पोहोचले होते.

Tags: MPvaccinationभोपाळमध्यप्रदेशलसीकरणशिक्षक जी आर झारिया
Previous Post

राज्यात ५ हजार ६०९ नवे रुग्ण, तर ७ हजार ७२० बरे झाले! ६ जिल्ह्यांमध्ये ० नवे रुग्ण!!

Next Post

यामाहा मोटरसायकल झोकात चालवणाऱ्या स्माईलवाल्या आजी!

Next Post
Grandma

यामाहा मोटरसायकल झोकात चालवणाऱ्या स्माईलवाल्या आजी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!