मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या या संकटकाळात लसीकरण हीच एक आशा दिसत आहे. मात्र काही लोक पैशासाठी अगदी जीवनरक्षक औषधांचाही काळाबाजार करत आहे, तर काही बनावट लस वापरून फसवणूकही करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत बनावट लसीकरणाच्या घटना उघडकीस आल्या असतानाच असताना वाराणसीत २० रुपयात गॅसची लस देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पर्यवेक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका जागरूक तरुणाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या नावाखाली भलत्याच लसीचं प्रकरण काय?
- काशीपूर गावात शनिवारी संध्याकाळी, पीएचसीमध्ये तैनात आरोग्य पर्यवेक्षक मोहन राम गावकऱ्यांना २० रुपयात कोविशिल्डच्या नावाने लस देत होता.
- गावातील एका तरुणाने नोंदणी न करता लस दिल्यानंतर प्रमाणपत्र मागितल्यावर तो धमकावू लागला.
- यामुळे त्या तरुणाला संशय आला आणि त्याने सिंधोरा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
- घटनास्थळी पोहचलेले एसएसआय संजीत बहादूर सिंह यांनी लसीची कुपी जप्त केली आणि प्रभारी वैद्यकीय अधिकारी पिंद्रा डॉ एचसी मौर्य यांना माहिती दिली.
२० रुपयात कोरोनाऐवजी गॅसची लस!
- लसीच्या कुपीच्या तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, ही लस डेक्सोना आणि असिलॉक आहे.
- डेक्सोना अॅन्टी अॅलर्जी आहे, तर असिलोक गॅसचे इंजेक्शन आहे.
- पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, पैसे कमवण्याच्या उद्देशाने तो गावकऱ्यांना २० ते २५ रुपये दरात लस देत होता.
- पिंड्रा पीएचसीमध्ये तैनात आरोग्य कर्मचारी बिरबलच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
एक आठवडा गावोगाव देत होता लस
- आरोपी आरोग्य पर्यवेक्षक, ज्याने कोरोना लसीच्या नावाने अॅलर्जीविरोधी लस देऊन वसूली केली.
- तो सिंधोरा पोलीस स्टेशन परिसरातील गडखडा गावाचा रहिवासी आहे.
- गावकरी रत्नेश पांडे यांनी सांगितले की, गेल्या एक आठवड्यापासून तो काशीपूर आरोग्य केंद्राच्या आसपासच्या गावात फिरत होता आणि कोविशील्डच्या नावाने बनावट लस देत होता आणि २० ते ५० रुपये वसूल करत होता.
- पोलीस आरोपींद्वारे कोरोना विरुद्ध लसीकरण केलेल्या सर्व लोकांची यादी तयार करत आहेत.
दुष्परिणान नसल्याने भलत्याच लसींचा फसवणुकीसाठी वापर
- पिंड्रा पीएसचीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. सी. म्हणाले की, डेक्सोना आणि असीलॉक लसीचे कोणतेही परिणाम होत नाही, यामुळे आरोपींनी याचा गैरफायदा घेत लोकांना लस दिली.
- डॉ.एच.सी. मौर्य यांनी सांगितले की, आरोपी हा आमच्या रुग्णालयात आरोग्य पर्यवेक्षक आहे.
- तो कोरोना लसीच्या नावावर अॅन्टी अॅलर्जी आणि गॅसवरील लस देत होता.
- हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
- पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
- यात आणखी कोणी सहभागी आहे का, याची चौकशी केली जाईल.