मुक्तपीठ टीम
करदात्यांसाठी आयकर विभागाने एक चांगली सेवा सुरु केली आहे. आयकर विभागाने करदात्यांना फेसलेस किंवा ई-मूल्यांकन योजनेअंतर्गत तक्रार नोंदवण्यासाठी तीन ईमेल आयडी जारी केले आहेत. विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.
- फेसलेस अॅसेसमेंटसाठी samadhan.faceless, assessment@incometax.gov.in वर तक्रार पाठवता येते.
- फेसलेस पेनल्टीसाठी Samadhan.faceless.penalty@incometax.gov.in हा इमेल वापरता येतो.
- फेसलेस अपीलासाठी samadhan.faceless.appeal@incometax.gov.in यावर तक्रार करता येईल.
विभागाने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “करदात्यांच्या सोयीसाठी आणि करदात्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी आयकर विभागाने ई-मेल आयडी जारी केले आहेत. करदाते या मेल आयडीवर आपल्या तक्रारी विभागाकडे पाठवू शकतात. करदाते आता फेसलेस स्कीम किंवा ई-मूल्यांकन प्रोग्राम आणि अपील प्रकरणांशी संबंधित तक्रारी मेलद्वारे दाखल करू शकतील.
- फेसलेस असेसमेंट सिस्टीम अंतर्गत, करदात्यांना आयकर विभागाच्या कार्यालयात किंवा विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे आयकर संबंधित कामासाठी जाण्याची गरज नाही.
- करदात्यांना आता कर प्राधिकरणाशी थेट संवाद साधण्याची गरज नाही.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दोघांमध्ये माहिती सामायिक केली जाते.
- या अंतर्गत, कोणतेही प्रकरण अचानक आयकर विभागाच्या कोणत्याही क्षेत्र अधिकाऱ्याला मूल्यांकनासाठी दिले जाते.
ही योजना सरकारने 2019 मध्ये फेसलेस असेसमेंट कार्यक्रमात पुढे नेली. देशातील प्रामाणिक करदात्यांना सन्मान देणे आणि कर संकलन पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. हे ई-मेल आयडी केवळ ते अधिक चांगले करण्यासाठी जारी केले गेले आहेत.