मुक्तपीठ टीम
भारतीय हवाई दलात सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक (एलडीसी), स्टोअर कीपर, कुक (सामान्य श्रेणी), पेंटर, कारपेंटर, कॉपर स्मिथ अॅंड शीट मेटल वर्कर, ए/सी मेकॅनिक अॅंड ए/सी मेकॅनिक (ए), फिटर, हाउस कीपिंग स्टाफ, लाँड्रीमन, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ, टेलर, ट्रेड्समन मेट, हिंदी टायपिस्ट या पदासाठी एकूण 197 जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 6 सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, 1) पद क्र.1- पदवीधर
2) पद क्र.2- 1) 12वी उत्तीर्ण 2) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3) पद क्र.3- 12वी उत्तीर्ण
4) पद क्र.4- 1) 10वी उत्तीर्ण 2) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र 3) 01 वर्ष अनुभव
5) पद क्र.5- 1) 10वी उत्तीर्ण 2) आयटीआय (पेंटर)
6) पद क्र.6- 1) 10वी उत्तीर्ण 2) आयटीआय (कारपेंटर)
7) पद क्र.7- 1) 10वी उत्तीर्ण 2) आयटीआय
8) पद क्र.8- 1) 10वी उत्तीर्ण 2) एअरक्राफ्ट मेकॅनिक प्रमाणपत्र 3) 01 वर्ष अनुभव
9) पद क्र.9- 1) 10वी उत्तीर्ण 2) आयटीआय (फिटर)
10) पद क्र.10,11,12,13,15- 10वी उत्तीर्ण
11) पद क्र.14- 1) 10वी उत्तीर्ण 2) आयटीआय (टेलर)
12) पद क्र.16- 1) 12वी उत्तीर्ण 2) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.